भारत जोडो यात्रेत सहभागी झाले नाहीत खरगे; राहुल गांधी कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 07:21 AM2022-10-13T07:21:29+5:302022-10-13T07:21:57+5:30
गांधी कुटुंबीयांवर अगोदरपासूनच हा आरोप होत आहे, की खरगे हे त्यांचे उमेदवार आहेत.
- आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार दोन दिवस कर्नाटकात असूनही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले नाहीत. अर्थात, यामागचे कारण स्वत: राहुल गांधी हेच होते.
राहुल गांधी यांनी निकटवर्तीयांना सांगितले होते की, खरगे यांनी कर्नाटकातून जात असलेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ नये. यातून असा संदेश जाईल की, राहुल गांधी हे खरगे यांचे समर्थन करीत आहेत. निवडणूक प्रचार सुरू करण्यापूर्वी खरगे कर्नाटकातच होते. पण याच कारणामुळे ते यात्रेत सहभागी झाले नाहीत.
गांधी कुटुंबीयांवर अगोदरपासूनच हा आरोप होत आहे, की खरगे हे त्यांचे उमेदवार आहेत. खरगे यांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा पूर्ण काँग्रेस कार्यसमिती त्यांची प्रस्तावक होती. मात्र, जेव्हा शशी थरूर हे प्रचार करण्यासाठी राज्यातील काँग्रेसच्या कार्यालयात जात आहेत, तेव्हा त्यांना प्रदेशाध्यक्ष
आणि मतदारांचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसते.