शहरं
Join us  
Trending Stories
1
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
2
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
3
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
4
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
5
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
6
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
7
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
8
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
9
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
10
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
11
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
12
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
13
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
14
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
15
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
16
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
17
Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर?
18
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
19
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
20
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...

Mallikarjun Kharge: 'जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिला', अदनींच्या मुद्द्यावरुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 3:59 PM

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गौतम अदानींचे नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

Mallikarjun Kharge On PM Modi: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adnai) यांना मदत केल्याचा आणि सत्तेत आल्यापासून खऱ्या मुद्द्यांवर न बोलून लोकशाही नष्ट केल्याचा आरोप केला. झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यात एका रॅलीमध्ये ते बोलत होते. 

यावेळी खर्गे म्हणाले, '2019 मध्ये गौतम अदानींची मालमत्ता 1 लाख कोटी रुपये होती. अडीच वर्षांत त्यांची संपत्ती 13 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली. हे तेच अदानी होते, ज्यांच्या फ्लाइटने मोदी शपथ घेण्यासाठी आले होते. अशी कोणती जादूची कांडी आहे, ज्याने अदानींची संपत्ती एवढी वाढवली? मोदींनी जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिल्याने हे घडले', असा आरोप खर्गेंनी केला.

काँग्रेस अध्यक्ष पुढे म्हणाले, 'मी मोदीजींना विनंती करेन की, देशातील गरीब, शेतकरी आणि मजुरांना ही कला शिकवावी. मग तुम्हाला इतके कष्ट करावे लागणार नाहीत. तुम्ही अदानींना 13 लाख कोटी रुपयांची मदत केली, देशातील लोकांना किमान 13 लाखांची मदत करा.' यावेळी भाजप सरकार लोकशाही नष्ट करत असल्याचा आरोप करत खर्गे म्हणाले की, 'माझ्या सभागृहातील भाषणासोबतच राहुल गांधींच्या भाषणाचा काही भागही हटवण्यात आला. काँग्रेस पक्षाने खरे मुद्दे मांडण्याचे काम केले. माझी कविताही काढली. त्यात असंसदीय काय होतं?... मोदीजींनी काही कविताही वाचल्या होत्या, पण त्या काढल्या नाहीत,' असंही खर्गे म्हणाले.

'लोकशाहीवर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही'झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्यावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, 'मोठ्या आणि जुन्या पक्षाला लोकशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसने निवडून आलेल्या बिगर काँग्रेस सरकारांना बरखास्त करण्यासाठी कायद्यांचा वापर केला. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी एकाच दिवसात राज्यातील भाजपची तीन सरकारे पाडली. ज्या पक्षाने आणीबाणी लादली, त्यांना लोकशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.'

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीGautam Adaniगौतम अदानी