शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मल्लिकार्जुन खरगे ८ व ९ जुलै रोजी मुंबईच्या दौऱ्यावर! शरद पवारांना भेटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 4:29 AM

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्यावरून उलटसुल चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे ८ व ९ जुलै रोजी मुंबईत येत आहेत. ते त्यावेळी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्यावरून उलटसुल चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे ८ व ९ जुलै रोजी मुंबईत येत आहेत. ते त्यावेळी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.ते काँग्रेसच्या राज्यातील सर्व नेत्यांशी चर्चा करतील. दिल्लीत शनिवारी खरगे यांनी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना बोलावून घेतले होते. या बैठकीत काँग्रेसच्या राज्यातील स्थितीविषयी चर्चा झाली. महाराष्ट्रात पक्ष मजबूत नसल्याबद्दल खरगे यांनी नाराजी व्यक्त केली आणि २0१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी नेत्यांनी संघटना बळकट करण्यासाठी कार्यकर्ता पातळीवर बैठका घ्याव्यात, अशा सूचना दिल्या.या बैठकीत काही नेत्यांनी आपली गाºहाणी तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य आघाडीबाबतची मते खरगे यांना ऐकवली. त्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली, पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आपण राज्याचा दौरा करून व सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकूनच योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.या बैठकीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, तसेच हर्षवर्धन पाटील, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, राजीव सातव, नितीन राऊत आदी नेते उपस्थित होते.भाजपाविरोधी आघाडी होणे सोपे नाहीदेशातील सर्व राज्यांमध्ये भाजपाविरोधी पक्षांची आघाडी होणे वाटते इतके सोपे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.एका मुलाखतीत ते म्हणाले की, माझ्या अनेक सहकाºयांना भाजपाविरोधी आघाडी होणे गरजेचे आहे, असे वाटते. पण माझ्या मते ते सोपे नाही.ती करण्यात असंख्य अडचणी आहेत.त्यामुळे आघाडीचा पंतप्रधानपदाचाउमेदवार कोण हीचर्चाही अर्थहीन आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र