विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची खरगेंची तयारी; सोनिया गांधींकडे प्रस्ताव सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 10:27 AM2022-10-02T10:27:53+5:302022-10-02T10:29:30+5:30
राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोडण्याचा लेखी प्रस्ताव मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोडण्याचा लेखी प्रस्ताव मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे दिला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आज हे पत्र पक्षाच्या अध्यक्षांकडे पाठविले. काँग्रेसने ‘एक व्यक्ती एक पद’ हे धोरण स्वीकारल्यामुळे त्यांनी हे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खरगे यांच्या या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यापुर्वी असल्याने नव्या विरोधी पक्षनेत्याची निवड जाहीर होण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"