Mallikarjun Kharge Z+ Security: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गृह मंत्रालयान खरगेंना Z+ प्लस सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. आयबीच्या थ्रेड पर्सेप्शन रिपोर्टच्या आधारे काँग्रेस अध्यक्षांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खरगे यांना मिळालेल्या झेड प्लस श्रेणीच्या सुरक्षेत सीआरपीएफचे एकूण 58 कमांडो 24 तास सुरक्षा पुरवतील. विशेष म्हणजे, काँग्रेस अध्यक्षांना मिळालेल्यी झेड प्लस श्रेणीची सुरक्षा देशभरात असेल. म्हणजेच, खरगे देशातील कुठल्याही राज्यात गेले तरीदेखील त्यांना ही सुरक्षा पुरवली जाईल.
Z Plus सुरक्षा म्हणजे काय?झेड प्लस सुरक्षेमध्ये सामान्यतः 55 कर्मचारी असतात, ज्यात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्व आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असतात. यातील प्रत्येक सदस्य मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कौशल्यांमध्ये तज्ञ असतो. देशातील सुमारे 40 व्हीआयपींना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.