Mallikarjun Kharge Louis Vuitton Scarf: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सभागृहात चर्चा झाली. यादरम्यान फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच चर्चेत नव्हते तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेही चर्चेत होते. त्यांच्या काही खास कपड्यांमुळे त्यांची चर्चा होत आहे.
पंतप्रधान मोदी निळ्या रंगाचे जॅकेट घालून संसदेत पोहोचले, तर खर्गेही खास मफलर परिधान करून आले. यानंतर भाजपने काँग्रेस आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरच निशाणा साधला. विशेष म्हणजे, सोशल मीडियावरही लोक त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. लोक दावा करत आहेत की, ज्या स्पेशल स्कार्फमध्ये खर्गे संसदेत दिसले होते, तो लुई व्हिटॉनचा असून त्याची किंमत 56,000 रुपये आहे.
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दोन छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात पीएम मोदी प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन बनवलेले खास जॅकेट घातलेले दिसत आहेत आणि दुसऱ्या छायाचित्रात खर्गे मफलर घातलेले दिसत आहेत. ज्यामध्ये मफलरची किंमत (56,332 रु.) नमूद करण्यात आली आहे.
मल्लिकार्जुन खर्गेंना ट्रोल करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, हे महागडे मफलर घालून खर्गे देशाच्या गरिबीवर बोलत होते. यानंतर सोशल मीडियावरही त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली. यापूर्वी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या पांढऱ्या टी-शर्टची जोरदार चर्चा झाली होती. राहुल यांचा टी-शर्ट 41 हजार रुपयांचा असल्याचा दावा केला जात होता.