भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 03:16 PM2024-09-29T15:16:22+5:302024-09-29T15:35:18+5:30

Mallikarjun Kharge : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रविवारी जम्मूमध्ये भाषण करताना अचानक बेशुद्ध पडले. जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे भाषणादरम्यान बेशुद्ध पडले.

Mallikarjuna Kharge fainted on the platform while giving a speech | भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

Mallikarjun Kharge ( Marathi News ) : जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. काँग्रेसच्या प्रचारसभा सुरू आहेत, आज रविवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे भाषण करताना बेशुद्ध पडले. जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे भाषणादरम्यान बेशुद्ध पडले. यानंतर ते स्टेजवर पडले. यानंतर त्यांना काही मिनिटे भाषण थांबवावे लागले.

काही वेळाने ते खाली बसले आणि काही मिनिटे भाषण केले, पण मध्येच थांबले. नंतर त्यांनी उभे राहून २ मिनिटे भाषण केले. निघताना त्यांनी सर्वांना उद्देशून सांगितले की, मी ८३ वर्षांचे असून अजून मरणार नाही. मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मरणार नाही, असे ते म्हणाले.

अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, या लोकांना कधीही निवडणुका घ्यायच्या नाहीत. त्यांना हवे असते तर एक-दोन वर्षात निवडणुका घेता आल्या असत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांना लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून रिमोट-नियंत्रित सरकार चालवायचे होते.

'पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षात भारतातील तरुणांना काहीही दिले नाही. १० वर्षांत तुमची समृद्धी परत आणू शकत नाही अशा व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? भाजपचा कोणताही नेता तुमच्यासमोर आला तर त्याला विचारा की त्यांनी समृद्धी आणली की नाही, असंही खरगे म्हणाले.

काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर यांनी सांगितले की, "मल्लिकार्जुन खरगे जसरोटा येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते तेव्हा त्यांना अस्वस्थ आणि चक्कर येऊ लागली. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना खुर्चीवर बसण्यास मदत केली," असंही काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर म्हणाले. खरगे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी खरगे जसरोटा येथे रॅलीला संबोधित करण्यासाठी गेले होते. उधमपूर जिल्ह्यातील रामनगरमध्ये ते आणखी एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

Web Title: Mallikarjuna Kharge fainted on the platform while giving a speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.