ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9- बॅंकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशामध्ये पसार झालेले उद्योगपती विजय माल्याने भारतात परत यायची तयारी दाखवली आहे. मात्र भारत सरकारने पासपोर्ट रद्द केला आहे त्यामुळे भारतात परतणे शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
विजय माल्ल्याच्या वकिलाने पटियाला कोर्टात सांगितले की, ते भारतात यायला तयार आहेत, मात्र भारत सरकारने त्यांचा पासपोर्ट रद्द केला आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत भारतात परतणे शक्य नाही. माल्ल्याच्या वकिलाने कोर्टात हजर राहण्यातून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाकडे उत्तर मागितले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.
पटियाला हाउस कोर्टाने विजय माल्ल्याविरोधात दोन वेळेस समन्स जारी केला असून स्वतः हजर राहण्याचे आदेश दिले होते.