शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2016 1:39 AM

तीनवेळा समन्स बजावूनही विजय मल्ल्या हजर न झाल्यामुळे सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आता दिल्लीतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला त्यांचा पासपोर्ट रद्द किंवा हस्तगत करावा, असे

- डिप्पी वांकाणी,  मुंबईतीनवेळा समन्स बजावूनही विजय मल्ल्या हजर न झाल्यामुळे सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आता दिल्लीतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला त्यांचा पासपोर्ट रद्द किंवा हस्तगत करावा, असे कळविले आहे. पासपोर्ट रद्द करण्यात आल्यास मल्ल्यांवर मायदेशी परतण्याचा दबाव निर्माण होईल, असा ईडीचा होरा आहे. ‘युबी ग्रुप’चे माजी अध्यक्ष मल्ल्या हे सध्या परदेशात आहेत. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे परदेशातील त्यांचे वास्तव्य बेकायदा ठरून त्यांना मायदेशी परतणे भाग पडेल, असे ‘ईडी’तील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. ईडीने मल्ल्यांविरुद्ध उचललेले हे पहिले पाऊल असून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटकवॉरंट काढण्यासाठी ईडी लवकरच न्यायालयातही धाव घेणार आहे. ईडीने मल्ल्यांना बजावलेल्या तिसऱ्या समन्समध्ये नऊ एप्रिलला चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते. मात्र, मल्ल्या हजर झाले नाहीत. ईडी ९०० कोटी रूपयांच्या आयडीबीआय कर्ज घोटाळ््याचा तपास करीत आहे. मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करावा, असे आम्ही पासपोर्ट प्रशासनाला लिहिले असून अजामीनपात्र अटक वॉरंटसाठी न्यायालयात कधी जायचे याचाही आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत, असे वरिष्ठ ईडी अधिकाऱ्याने सांगितले. मल्ल्यांकडे दुसऱ्या एखाद्या देशाचा पासपोर्ट आहे काय असा प्रश्न विचारला असता हा अधिकारी म्हणाला की, ते आम्हाला ठावूक नाही. तथापि, त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द करावा, असे आम्ही पासपोर्ट कार्यालयाला लिहिले आहे. त्यामुळे ते जेथे कोठे आहेत तेथून मायदेशी परतण्यासाठी त्यांच्यावर दबाव निर्माण होईल. आम्ही मल्ल्यांना यापुढे समन्स पाठविणार नसून त्यांच्याविरुद्ध आता कोणती कायदेशीर कारवाई करायची याबाबत विचारविनिमय सुरू आहे.