शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
2
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
3
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
4
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
5
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
8
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
9
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
10
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
11
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
12
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
13
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
14
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
15
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
16
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
17
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
18
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
19
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
20
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली

Mamata Banerjee: 'हिम्मत असेल तर मला अटक करुन दाखवा', ममता बॅनर्जींचे भाजपला आव्हान...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 6:11 PM

Mamata Banerjee Rally: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

Mamata Banerjee Slams BJP: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) वरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपवर(BJP) जोरदार हल्ला चढवला आहे. ममता बॅनर्जी सोमवारी एका रॅलीला संबोधित करताना म्हणाल्या की, "निवडून आलेले सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पैसे कोठून मिळतात याचे त्यांनी उत्तर द्यावे. निवडून आलेल्या राज्य सरकारांना पाडण्यासाठी काळा पैसा आणि केंद्रीय एजन्सीचा वापर केला जात आहे."

'घोटाळा झाला पण..."ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, "भाजपचे नेते बेटी बचाओच्या गप्पा मारतात, पण त्यांच्या सरकारने बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना सोडले. भाजपवाले आम्हाला चोर म्हणतात. घोटाळा झाला आहे, पण डाव्या पक्षांनी केला आहे. पैसे खाण्याची त्यांची संस्कृती आहे, आमची नाही."

'हिम्मत असेल तर मला अटक करा'त्या पुढे म्हणाल्या की, ''हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, आम्ही भ्रष्ट असल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात कोणताही पुरावा सादर करू शकले नाही. पण, इकडे मीडिया ट्रायल सुरू असून ते आम्हाला चोर म्हणत आहेत. हे सर्व षडयंत्र आहे, मीडियावर विश्वास ठेवू नका. ते आमच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत. मी त्यांना आव्हान देते की, हिम्मत असेल तर मला अटक करा. मी तुरुंगातून लढेन आणि जिंकेन. तुम्ही माझ्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,'' अशी टीका ममतांनी केली. 

'महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी पैसा कुठून आला?'ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, "महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च केले, हा पैसा कुठून आला? तुम्ही झारखंडच्या आमदारांना पैसे देऊ केलेत. तुम्हाला झारखंड सरकार तोडायचे होते, मी ते थांबवले. अरविंद केजरीवाल म्हणतात, त्यांच्या आमदारांना पैसे देऊ केले आहेत. हा सगळा पैसा कुठून येत आहे," असा सवालही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा