'ममता बॅनर्जींची वागणूक 'किंग जोन उन'सारखी, विरोधकांच्या हत्येचा घाट'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 08:42 AM2021-03-28T08:42:10+5:302021-03-28T08:43:04+5:30

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांत मतदान घेण्यात आले

Mamata Banerjee behaves like 'King John Un', says bjp leader giriraj singh | 'ममता बॅनर्जींची वागणूक 'किंग जोन उन'सारखी, विरोधकांच्या हत्येचा घाट'

'ममता बॅनर्जींची वागणूक 'किंग जोन उन'सारखी, विरोधकांच्या हत्येचा घाट'

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपा नेते आणि खासदार गिरीराजसिंह यांनी ममत बॅनर्जींच्या वागणुकीला उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनची उमपा दिलीय. 

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीसाठीच्या (West Bengal Assembly Election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडले. येथील 294 जागांपैकी 30 जागांसाठी होत असलेल्या मतदानासाठी मतदाता मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसून आले. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात मुख्य लढत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे, तृणमूल काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये घमासान पहायला मिळत असून आरोप प्रत्यारोपाच्याही फैरी झडत आहेत. भाजपा नेते आणि खासदार गिरीराजसिंह यांनी ममत बॅनर्जींच्या वागणुकीला उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनची उमपा दिलीय. 

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांत मतदान घेण्यात आले. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपा कार्यकर्त्याची हत्या झाल्याचं सांगण्यात आल होतं. तर, नुकताच टीएमसी सोडून भाजपचा भगवा हाती घेतलेले शुभेंदू अधिकारी यांचे भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीवर कांठी यथे हल्ला झाला आहे. मात्र, यावेळी सौमेंदू कारमध्ये नव्हते. या हल्ल्यात कारचालक जखमी झाला आहे. यानंतर या हल्ल्याचा आरोप टीएमसीवर करण्यात येत आहे. त्यावरुन, गिरीराजसिंह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. 


शुभेंदू अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर हल्ला झाला असून ममता बॅनर्जींच्या निराशेचं हे कारण आहे. ममता बॅनर्जी या सीपीएमविरोधात सत्तेत आल्या, पण आता सीपीएमपेक्षाही त्या पुढे गेल्या आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनप्रमाणे त्या वागत आहेत. आपल्या विरोधकांना संपवून टाकण्याचा त्यांचा डाव आहे. त्या, आपल्या विरोधकांना जिवंत ठेवू इच्छित नाहीत.  2 मे रोजी याचा सुफडा साफ होईल, असे गिरीराजसिंह यांनी म्हटलंय. 

टीएमसी नेत्यावर आरोप -

सौमेंदू यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात कारचालक जखमी झाला आहे. सुवेंदू अधिकारी यांचे भाऊ दिब्येंदू अधकारी यांनी आपल्या भावाच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासाठी टीएमसी नेत्यावर आरोप केला आहे. ते म्हणाले, मला माहिती मिळाली आहे, की टीएमसीच्या ब्लॉक अध्यक्षाने सौमेंदू अधिकारी यांच्या कारवर हल्ला करवला. यात कारचालकालाही मारहाण करण्यात आली आहे. यात कारचालक जखमी झाला आहे. कारवर झालेल्या हल्ल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

कोशियारीत भाजपा कार्यकर्त्याचा आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, केशियारीमध्ये भाजपा कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे. या कार्यकर्त्याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. "घरात घुसून झोपलेल्या भाजपा कार्यकर्त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली" असं म्हटलं आहे. रात्री मंगल सोरेन बाहेर झोपला होता, सकाळी त्याचा त्याच ठिकाणी मृतदेह आढळला असं सांगितलं जात आहे. भाजपा उमेदवार सोनाली मुर्मु यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सकाळी असं ऐकायला मिळालं, की बेगमपूर चार नंबर बूथवर एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्याची हत्या करण्यात आली आहे. रात्री तो घराबाहेर झोपला होता, मात्र सकाळी त्याच्या आईला त्याठिकाणी त्याचा मृतदेह दिसला."

कूचबिहार क्षेत्रात फासावर लटकलेला मृतदेह

बंगालच्या कूचबिहार लोकसभा क्षेत्रात (Coochbehar) दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांचा फासावर लटकवलेला अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पक्ष कार्यालयाच्या जवळच त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमित सरकार यांची पूर्व नियोजित हत्याच आहे, असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. तसेच "राज्यात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार आहे" असं देखील भाजपाने म्हटलं आहे. 
 

Web Title: Mamata Banerjee behaves like 'King John Un', says bjp leader giriraj singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.