पाटण्यात एकत्र बैठक, आता ममतांची काँग्रेसवर टीका; भाजपची बी-टीम असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 04:52 PM2023-06-26T16:52:07+5:302023-06-26T16:52:28+5:30

अलीकडेच सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात बैठक घेतली, पण लगेच या विरोधी ऐक्यात फूट पडल्याचे दिसत आहे.

mamata banerjee , congress, Meeting together in Patna, now Mamata criticizes Congress; Alleged to be B-Team of BJP | पाटण्यात एकत्र बैठक, आता ममतांची काँग्रेसवर टीका; भाजपची बी-टीम असल्याचा आरोप

पाटण्यात एकत्र बैठक, आता ममतांची काँग्रेसवर टीका; भाजपची बी-टीम असल्याचा आरोप

googlenewsNext


Mamata Banerjee : बिहारच्या पाटण्यात 23 जून रोजी विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर विरोधक एकत्र येतील, अशी सर्वांना आशा आहे. पण, तिकडे बंगालमध्ये परत जाताच ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि सीपीएमवर जोरदार टीका केली. ममतांनी काँग्रेस-सीपीएम आणि भाजपचे 'महा-घोट' असे वर्णन केले. 'भाजपच्या जाळ्यात अडकू नका, भाजप हा खोटारड्यांचा पक्ष आहे, त्या पक्षाला मतदान करू नका. काँग्रेस आणि सीपीएमलाही बाय बाय', अशी टीका ममतांनी केली.

कूचबिहारमधील पंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ममता म्हणाल्या की, या तिन्ही पक्षांनी हातमिळवणी केली आहे. दिल्लीत भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते माझ्याबद्दल अपशब्दही बोलतात. त्यांना 'महा-घोट' (महाआघाडी) निर्माण करायची आहे. पण, त्यांची महा-घोट मी तोडेन आणि दिल्ली-बंगालमध्ये फक्त महा-जोत राहील,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ममता यांनी काँग्रेसला बंगालमध्ये भाजपची टीमदेखील म्हटले आहे. 

सुकतन मुझुमदार यांनी उत्तर दिले

ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर बंगाल भाजपचे प्रमुख सुकांता मजुमदार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही पाटण्याला सीपीएम आणि काँग्रेससोबत बैठक करायला गेला होतात. आता आमच्यावर आरोप करत आहात. कॅमेरा खोटं बोलत नाहीत. सीताराम येचुरी तुम्हाला काय म्हणत होते? तुम्ही किंवा तुमचा पुतण्या कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

अधीर रंजन यांनी ममताला घेरले
ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले की, 12 वर्षांनंतर बॅनर्जी पंचायत निवडणुकीत प्रचार करत आहेत, यावरून टीएमसीची कमजोरी दिसून येते. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेच नाही, तर पक्षाचे काय होणार हे त्यांना कळून चुकले आहे.

Web Title: mamata banerjee , congress, Meeting together in Patna, now Mamata criticizes Congress; Alleged to be B-Team of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.