शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

लॉकडाऊन उल्लंघनाबद्दल ममता बॅनर्जी सरकारची केंद्राकडून कानउघाडणीे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 5:28 AM

केंद्रीय गृह मंत्रालयाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाची साथ अधिक फैलावू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता राज्य सरकारने घेणे अपेक्षित होते.

नवी दिल्ली : जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची विक्री करणारी दुकाने खुली ठेवण्यास तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास लॉकडाऊनच्या काळात परवानगी देऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने नियमभंग केला आहे. त्याची गंभीर दखल घेत राज्य सरकारला खडसावत या प्रकरणाबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने अहवाल मागविला आहे.

यासंदर्भात गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालक यांना एक पत्र लिहिले आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोष्टींना परवानगी देणाºया पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी व काय कारवाई केली याचा अहवाल केंद्राला पाठवावा, असा आदेश त्यांना या पत्राद्वारे देण्यात आला आहे. राज्यातील मिठाईची, फुलांची दुकाने लॉकडाऊनच्या काळातही खुली ठेवण्यास ममता बॅनर्जी सरकारने परवानगी दिली होती. या कालावधीत पश्चिम बंगालमध्ये काही धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासही परवानगी देण्यात आली. हे कार्यक्रम अल्पसंख्याक समाजाचे होते. कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर फैलावू नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग राखा, असे केंद्र सरकारकडून वारंवार आवाहन करण्यात येत असतानाच, पश्चिम बंगालमध्ये या गोष्टी धुडकावून लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.मार्केटमधील गर्दी कायमकेंद्रीय गृह मंत्रालयाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाची साथ अधिक फैलावू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता राज्य सरकारने घेणे अपेक्षित होते. भाजीपाला, मासळी तसेच मटण मार्केटमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने कोणतेही नियोजन केलेले नाही. कोलकाता शहरातील राजाबाजार, नर्केल दांगा, तोपसिया, मेतियाब्रूज, गार्डन रिच, इक्बालपूर, माणिकताला या ठिकाणच्या मार्केटमध्ये लॉकडाऊनच्या काळातही प्रचंड गर्दी आढळून आली. या गोष्टींमुळे कोरोनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांना हरताळ फासला गेला आहे, असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई