शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

Mamata Banerjee: 'गरज पडल्यास भीक मागेन, पण केंद्रासमोर...' CM ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 7:32 PM

Mamata Banerjee : निधीच्या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जींची टीका. काय म्हणाल्या, वाचा...

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निधीच्या मुद्द्यावरुन केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदी सरकारविरोधात तीव्र वक्तव्य करताना त्या म्हणाल्या की, साडीचा पदर पसरुन राज्यातील महिलांकडे भीक मागेल, पण दिल्लीसमोर हात पसरणार नाही. यासोबतच पुढील वर्षी बंगालला केंद्राकडून निधी मिळणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कोलकाता येथे जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (13 एप्रिल) म्हटले की, "माझ्या मनात एकच गोष्ट येते की, लोकांनी माझ्याबद्दल गैरसमज करुन घेऊ नये. केंद्राकडून आम्हाला कधी निधी दिला जातो तर कधी दिला जात नाही. आता आम्हाला 2024 पर्यंत काहीही दिले जाणार नाही, अशी माहिती मिळत आहे. गरज पडली तर मी साडीचा पदस पसरून राज्यातील महिलांसमोर भीक मागेन, पण मी कधीच दिल्लीसमोर जाणार नाही.''

केंद्राकडून 7 हजार कोटी बाकी29 मार्च रोजी ममता बॅनर्जी याच निधीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारच्या विरोधात दोन दिवसीय धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. 100 दिवसांच्या कामाच्या योजनेसह इतर योजनांसाठी राज्याला केंद्राकडून निधी मिळत नसल्याचा आरोप पश्चिम बंगाल सरकारने केला आहे. तर, जीएसटीचा वाटाही मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. ममता सरकारचा आरोप आहे की, केंद्राकडे बंगालचे सात हजार कोटी रुपये येणे बाकी आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी