2024ला आम्ही बंगालमधून एक खेळ सुरू करू, मग...; भाजपाला रोखण्यासाठी ममतांचा 'मेगा प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 06:18 PM2022-09-08T18:18:12+5:302022-09-08T18:19:07+5:30

'भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येणार.'

Mamata Banerjee: In 2024 we will start a game from Bengal, then...; Mamata's 'mega plan' to stop BJP | 2024ला आम्ही बंगालमधून एक खेळ सुरू करू, मग...; भाजपाला रोखण्यासाठी ममतांचा 'मेगा प्लॅन'

2024ला आम्ही बंगालमधून एक खेळ सुरू करू, मग...; भाजपाला रोखण्यासाठी ममतांचा 'मेगा प्लॅन'

Next

कोलकाता: 2024ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी मूठ बांधायला सुरुवात केली आहे. याचाच भाजप म्हणजून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(Nitish Kumar) तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या. यानंतर आता ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनीही केंद्राविरोधात रणशिंग फुंकले आहे. ''आम्ही सर्व विरोधक एकत्र येऊ आणि भाजपला सत्तेतून दूर करू. पश्चिम बंगालमधून 'खेला होबे'', असा हुंकार ममतांनी एका सभेला संबोधित करताना दिला.

टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना 2024 मध्ये बंगालमधून खेळ सुरू होणार, असे म्हटले आहे. तसेच, त्यांनी हेमंत सोरेन, अखिलेश यादव, नितीश कुमार, मी आणि इतर पक्ष एकत्र येऊन भाजपला रोखू असेही म्हटले. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीही विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.

तिसरी नाही, मुख्य आघाडी तयार होणार: नितीश कुमार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी तिसर्‍या आघाडीची शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले की, 'आता देशात तिसरी आघाडी नाही, तर मुख्य आघाडी स्थापन केली जाईल. विविध पक्षाच्या नेत्यांकडून भेटण्यासाठी फोन यायचे, म्हणूनच दिल्लीत आलो. सर्वांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकवटत आहेत. लोकसभेत मुख्य आघाडी स्थापन होईल.' 

नितीश कुमारांच्या भेटी सुरू
नितीश कुमार यांनी दिल्लीत राहुल गांधी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीएम) सरचिटणीस सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) सरचिटणीस डी राजा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, इंडियन नॅशनल लोक दल (आयएनएलडी)चे प्रमुख ओम प्रकाश चौटाला, समाजवादी पक्षाचे (आयएनएलडी) अध्यक्ष डॉ. मुलायमसिंह यादव आणि त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. 
 

Web Title: Mamata Banerjee: In 2024 we will start a game from Bengal, then...; Mamata's 'mega plan' to stop BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.