मुंबई:राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई होऊ शकते. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने ममता बॅनर्जी यांना 2 मार्चला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपच्या एका कार्यकर्त्याने ममता यांच्यावर राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे आरोपात म्हटले आहे.
मुंबई दौऱ्यावर ममतांनी गायले अपूर्ण राष्ट्रगीत?
हे संपूर्ण प्रकरण जवळपास दोन महिने जुने आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर मुंबईत आल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत बैठक घेतली होती. त्या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे सांगण्यात आले आहे.
पाहा व्हिडिओ-
काय आहे भाजप नेत्याचा आरोप?कार्यक्रमाच्या शेवटी ममतांनी राष्ट्रगीताच्या काही ओळीच वाचल्या होत्या. त्यावेळी ममतांनी खाली बसून अपूर्ण राष्ट्रगीत गायल्याचा आरोप भाजप नेत्याने केला. ममतांनी राष्ट्रगीताच्या 4-5 ओळी वाचल्या आणि नंतर उभ्या राहिल्या, असा आरोप भाजप नेत्याचा आहे. या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.