Mamata Banerjee Remarks: लोकसभा निवडणुका जवळ येत असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकांवरील टीका वाढल्या आहेत. यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (21 ऑगस्ट) मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय यंत्रणा आणि धर्माचा मुद्दा उपस्थित केला.
कधीही डोकं टेवणार नाहीपीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या, "आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांसमोर कधीही डोकं टेकवणार नाहीत. मी धर्माच्या आधारावर शत्रुत्वाच्या विरोधात आहे. देशातील विविध समाजांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी पैसा खर्च केला जातोय. भाजप बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विरोधात काँग्रेस आणि माकपचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे."
मोदीजी फक्त सहा महिने राहतील...पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मोदीजी फक्त सहा महिने राहतील. त्यांना हटवण्यासाठी आम्ही जे काही आवश्यक असेल ते करू. मी INDIA सोबत आहे. मी माझ्या राज्यात NRC ला परवानगी देणार नाहीत," अशी टीकाही ममतांनी यावेळी केली.
अभिषेक बॅनर्जींना दिलासा नाहीच
ममता बॅनर्जींचे हे विधान तेव्हा समोर आले, जेव्हा त्यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेस नेते अभिषेक बॅनर्जी यांना सोमवारी (21 ऑगस्ट) नोकरभरती अनियमिततेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. या प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने अभिषेक बॅनर्जी यांना सीबीआय आणि ईडीच्या चौकशीतून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला.