शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

ममता बॅनर्जींनी दिली ईव्हीएम विरोधात आंदोलनाची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 9:45 AM

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर ममता यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ठळक मुद्देतृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर ममता यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.ईव्हीएम विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.

कोलकाता - तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर ममता यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच मतदान बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच घेतलं जावं याची मागणी लावून धरण्याचं आवाहन ममता यांनी इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही केलं आहे. 

ममता यांनी ईव्हीएम मशीनसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांचा तपास करण्यासाठी 'फॅक्ट-फाइंडिंग' समितीची स्थापन करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (3 जून) पक्षाचे आमदार आणि राज्यातील मंत्र्यांची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.  

'आम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही आंदोलन करणार असून त्याची सुरुवात पश्चिम बंगालमधून होईल' असं ममता यांनी पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. तसेच भाजपाने 23 जागांचा दावा केला होता, पण त्यांनी 18 जागा जिंकल्या आहेत. मतदानाची टक्केवारी पाहता यंदा तृणमूलला मिळालेल्या मतांचं प्रमाण 4 टक्क्यांनी वाढलं असल्याचं ममतांनी म्हटलं आहे. 

भाजपाच्या ‘जय श्रीराम’ नाऱ्याला ममता बॅनर्जींचे ‘जय हिंद’ने उत्तरभाजपा कार्यकर्त्यांच्या ‘जय श्रीराम’च्या घोषणेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच तृणमूल काँग्रेसने ‘जय हिंद’ने उत्तर द्यायचे ठरविले आहे. त्याची सुरुवात ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटरवर हँडल व फेसबुकवरील डिस्प्ले प्रोफाईलवरही (डीपी) तो नारा दिला आहे. तृणमूलच्या अनेक नेत्यांनीही लगेच त्यांचे अनुकरण केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या नव्या डीपीवर जय हिंद, जय बांगला ही घोषणा लिहिली आहे. त्याशिवाय महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन राय, रवींद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ईश्वरचंद्र विद्यासागर, मातंगिनी हाजरा व काझी नजरुल इस्लाम यांची छायाचित्रेही त्या डीपीमध्ये आहेत.

...जेव्हा ममता बॅनर्जी भाजपच्या कार्यालयाचा घेतात ताबापश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता थेट एकमेकांचे पक्ष कार्यालय त्याब्यात घेण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मारामारीवर उतरले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपाने आपले कार्यालय थाटले असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत आहे. शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी भाजपाचे कार्यालायचे  कुलूप तोडून आपल्या त्याब्यात घेत, तिथे आपल्या पक्षाचे कार्यालय सुरू केलं. भाजपच्या कार्यालयवरील भाजपाचे चिन्ह आणि भगवा रंग मिटवण्याचे आदेश दिले. त्यांनतर त्यांनी स्वतः आपल्या पक्षाचे चिन्ह काढत भाजपाच्या त्या कार्यालयाला आपल्या पक्षाचे नाव दिले

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकBJPभाजपाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल