नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदीविरुद्ध आणि केंद्र सरकारविरुद्ध आपली भूमिका बजावतात. मात्र, मंगळवारी मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पंतप्रधानांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे त्याचदिवशी ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांची अचानक भेट झाली. कोलकाता येथील विमानतळावरुन नवी दिल्लीकडे रवाना होण्यासाठी ममता बॅनर्जीविमानतळावर पोहोचल्या होत्या. त्यावेळी, ममता यांना जशोदाबेन या कोलकाता विमानतळावर दिसल्या. त्याक्षणी ममता यांनी धावत जाऊन जशोदाबेन यांची भेट घेतली. यावेळी, दोघांमध्ये सुखद संवादही झाला.
जशोदाबेन ह्या झारखंडमधील धनबाद येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर होत्या, धनबादवरुन परतताना त्या कोलकाता विमानतळावर आल्या होत्या, अशी माहिती सुत्रांनी दिली. अचानकपणे झालेल्या भेटीमुळे दोघांनाही मोठा आनंद झाला. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही जशोदाबेन यांचे स्वागत केले. तसेच, जशोदाबेन यांना भेट स्वरुपात एक साडीही देण्यात आली. त्यानंतर ममत दीद दिल्लीकडे रवाना झाल्या. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पश्चिम बंगालच्या समस्या मांडणार आहे. तसेच, राज्यासाठी निधींची तरतूद करण्याची विनंतीही जशोदाबेन करणार आहेत. दरम्यान, जशोदाबेन यांनी सोमवारी पश्चिम बंगालच्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील आसनसोल येथे कल्याणेश्वरी मंदिरात पूजा केली होती. आसनसोल हे धनबादपासून 65 किमी अंतरावर आहे.