कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार आणि सीबीआयमध्ये सुरू असलेला वाद विकोपाचा गेला आहे. या वादात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु ममतांच्या समर्थनावरूनच काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. ममता बॅनर्जी डाकू आणि चोरांबरोबर उभ्या आहेत.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अधीर रंजन चौधरी यांनी हे विधान केलं आहे. ममता बॅनर्जी चौकशीला घाबरतायत, या घोटाळ्यात टीएमसीच्या अनेक मोठ्या नेत्यांची नावं आहेत. अधीर रंजन म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून चौकशी केली जात आहे. परंतु ममता बॅनर्जी डाकू आणि चोरांबरोबर उभ्या आहेत. हे कसलं राज्य आहे, जिथे भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी ममता बॅनर्जी धरणे आंदोलन करत आहेत. पक्ष नेतृत्वाचं वेगळं मत असलं तरी ममता बॅनर्जी या चुकीच्या आहेत. कारण त्या त्यांच्या डोळ्यांनी पश्चिम बंगालमध्ये चुकीच्या घटना होताना पाहत असतात. काल रात्री उशिरा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने मोदी, अमित शहा व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी बंगालमधील लोकनियुक्त सरकार उलथून टाकण्याचे कारस्थान रचल्याचा त्यांच्यावर आरोप केला.
Mamata VS CBI: "ममता डाकू अन् चोरांचा बचाव करतायत", ममतांच्या पाठिंब्यावरून दोन गटांत विभागली काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 10:43 AM
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार आणि सीबीआयमध्ये सुरू असलेला वाद विकोपाचा गेला आहे.
ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार आणि सीबीआयमध्ये सुरू असलेला वाद विकोपाचा गेलाममतांच्या समर्थनावरूनच काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय. ममता बॅनर्जी डाकू आणि चोरांबरोबर उभ्या आहेत.