ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २७ - डाव्या आघाडीला पुन्हा जोरदार धक्का देत पश्चिम बंगालमध्ये दुस-यांदा सत्तेवर आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींनी आज दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या आठवड्यात पश्चिम बंगाल विधासभा निवडणुकीचे निकाल लागले आणि तृणमूलने २०० हून अधिक जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर ममताच पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे निश्चित झाले. त्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी तृणमूलच्या मंत्र्याचा शपथविधी पार पडला.
विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यास इतर पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशिवाय लालूप्रसाद यादव, फारुख अब्दुल्ला, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, अरविंद केजरीवाल हे भाजपाविरोधी आघाडीतील नेते उपस्थित होते.
Kolkata: TMC MLAs take oath as ministers in West Bengal Govt pic.twitter.com/FZwvLtiQTt— ANI (@ANI_news) May 27, 2016
Lalu Prasad Yadav and Farooq Abdullah at Mamata Banerjee's oath taking ceremony in Kolkata pic.twitter.com/GpNSyfv8m9— ANI (@ANI_news) May 27, 2016
Union Minister Babul Supriyo, Delhi CM Arvind Kejriwal and UP CM Akhilesh Yadav at Mamata Banerjee's oath ceremony pic.twitter.com/0Efvi6qrDQ— ANI (@ANI_news) May 27, 2016