प्रचारासाठी आलेल्या भाजपा आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 02:53 PM2018-11-20T14:53:33+5:302018-11-20T14:56:15+5:30
सलग तीन वेळा मध्य प्रदेशची सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला यावेळच्या निवडणुकीत मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे.
भोपाळ - सलग तीन वेळा मध्य प्रदेशची सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला यावेळच्या निवडणुकीत मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी प्रचाराला येणाऱ्या भाजपा उमेदवारांवर मतदारांकडून प्रश्नांची सरबत्ती होत आहे. असाच प्रकार राज्यातील नागदा जिल्ह्यामधील खाचरोद मतदारसंघात घडला आहे. सोमवारी संध्याकाळी येथे प्रचार करण्यासाठी आलेल्या भाजपा आमदाराच्या गळ्यात एका व्यक्तीने चपलांचा हार घातला.
खाचरोद मतदारसंघातून भाजपा आमदार दिलीप शेखावत निवडणूक लढवत आहेत. सोमवारी संध्याकाळी ते आपल्या मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. मतदारांच्या भेटी गाठी आशीर्वाद घेत असतानाच अचानक एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला. सुरुवातीला आमदार महोदयांना काहीच कळले नाही. मात्र गळ्यात चपलांचा हार पाहिल्यावर संतप्त झालेल्या आमदारांनी या व्यक्तीला मारहाण केली. त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ वादावादी सुरू होती.
#WATCH: A man greets BJP MLA and candidate Dilip Shekhawat with
— ANI (@ANI) November 20, 2018
a garland of shoes in Madhya Pradesh's Nagada. (19.11.2018) pic.twitter.com/LmYMAaP8Me
विषेश बाब म्हणजे आमदारांना चपलांचा हार घालणाऱ्या व्यक्तीने भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळाचा छाप असलेली टोपी परिधान केली होती. मात्र या व्यक्तीची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.