भोपाळ - जवळच्या मानसासाठी लोक कुठल्याही क्षणी काहीही करायला तयार असतात. त्यांना अनेक वेळा चूक अथवा बरोबरचेही भान राहत नाही. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातून एक अशीच घटना समोर आली आहे. येथे एका युवकाने आपल्या गर्भवती पत्नीची प्रकृती खालावत असल्याचे पाहून अॅम्ब्यूलन्स बोलावली, या अॅम्ब्यूलन्समध्ये ऑक्सिजन होता. यानंतंर या युवकाने ही अॅम्ब्यूलन्सच हायजॅक करून टाकली.
येथील पुतली घाट भागातील मुखर्जी नगरमधील कुशवाहा कुटुंबात 4 दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेला ऑक्सीजनची आवश्यकता होती. तिच्या पतीने ऑक्सीजनची व्यवस्थ केली होती. मात्र, घरी अॅम्ब्यूलन्स आली तर तिला रुग्णालयात भरती करता येईल, असे त्याला वाटत होते.
CoronaVirus: संकट काळात अमेरिकेनं फिरवली पाठ, तर भारताच्या 'या' खास मित्रानं पुढे केला मदतीचा हात!
मात्र, रुग्णालयात नव्या रुग्णांना घेत नाही, हे त्याला माहीत होते. त्यामुळे 108 अॅम्ब्यूलन्स त्याच्या घरी पोहचल्यानंतर त्याने ही अम्ब्यूलन्स रोखून धरली. यानंतर 2 तासांनी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी येथे संबंधित व्यक्तीला समजावून सांगितले. यानंतर त्याच्या पत्नीला बंदी बनवून ठेवलेल्या त्याच अॅम्ब्यूलन्सने रुग्णालयात नेवून भरती करण्यात आले. अॅम्ब्यूलन्सचा अटेंडर दीपक याने आरोप केला आहे, की संबंधित महिलेचा पती अॅम्ब्यूलन्सच्या काचा तोडण्याची आणि तिचे नुकसान करण्याचीही धमकी देत होता.
अटेंडरने सांगितले, की मी वरिष्ठांशी संपर्क साधला असता त्यांनी मला डायल हंड्रेडला सूचना देण्याचे सांगितले. तेव्हा पोलीस येथे आले. विदिशा सीएसपींनी दिलेल्या महितीनुसार, आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावले आणि नंतर रुग्णालयात दाखल केले.
कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?
मिळालेल्या माहितीनुसार, गर्भवती महिलेला चार दिवसांपासून कोरोनाची लागण झालेली होती आणि तिच्यावरील उपचारासाठी तिचा पती सुनील कुशवाहा शुक्रवारी रात्री 11:00 वाजल्यापासूनच मेडिकल कॉलेजला 108 अॅम्ब्यूलन्स पाठविण्यासाठी फोन करत होता. मात्र, संपूर्ण रात्र अॅम्ब्यूलन्स आली नाही, ती दुसऱ्या दिवशी सकाळीच 9:30 वाजता आली.
यासंदर्भात सुनीलने म्हटले आहे, की माझी पत्नी गर्भवती आहे. मी 1 दिवस आधीपासूनच अॅम्ब्यूलन्ससाठी फोन करत होतो. अटेंडर सातत्याने येत आहे, असे सांगूनही आला नाही. याच दरम्यान मी ऑक्सीजन सिलेंडरचीही व्यवस्था केली होती. एवढेच नाही तर अॅम्ब्यूलन्स न आल्याने मी ग्यारसपूर येथील रुग्णालयातील डॉक्टरांशीही संपर्क साधला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी अॅम्ब्यूलन्स आली तेव्हा मी ती दोन तास थांबवून धरली.