शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

लग्नानंतर वाढलेला खर्च भागविण्यासाठी वकिलाने लुटली बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 9:10 AM

लग्नानंतर खर्च वाढल्याने चिंतेत असलेल्या वकिलाने चक्क बँक लुटल्याची घटना घडली आहे. मोहालीमध्ये ही घटना घडली.

ठळक मुद्देलग्नानंतर खर्च वाढल्याने चिंतेत असलेल्या वकिलाने चक्क बँक लुटल्याची घटना घडली आहे. मोहालीमध्ये ही घटना घडली. . बँक लुटल्यानंतर पैसे घेऊन पळून जात असताना त्या वकिलाच्या गाडीची नंबर प्लेट पडली त्यामुळे त्याला पकडणं पोलिसांना सोपं झालं वकिलाने पोलिसांना कार स्नॅचिंगची खोटी कहाणी सांगून फसविण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये तो वकील स्वतःच फसला.

चंदीगड, दि. 28- लग्नानंतर खर्च वाढल्याने चिंतेत असलेल्या वकिलाने चक्क बँक लुटल्याची घटना घडली आहे. मोहालीमध्ये ही घटना घडली. बँक लुटल्यानंतर पैसे घेऊन पळून जात असताना त्या वकिलाच्या गाडीची नंबर प्लेट पडली त्यामुळे त्याला पकडणं पोलिसांना सोपं झालं. त्या वकिलाने पोलिसांना कार स्नॅचिंगची खोटी कहाणी सांगून फसविण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये तो वकील स्वतःच फसला. या वकिलाचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्नानंतर वाढलेल्या खर्चामुळे त्यांची चिंता वाढली होती. तसंच त्या वकिलाच्या डोक्यावर खूप कर्जसुद्धा असल्याची माहिती त्याने दिली आहे. 

आरोपी वकिलाने मोहाली फेस 7च्या इंडस्ट्रिअल एरियामध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामधून साडे सात लाख रूपये लुटले. मनजिंदर सिंह असं आरोपीचं नाव आहे. आरोपी मनजिंदर यांच्या डोक्यावर कर्ज होतं. त्या कर्जाची लवकर परतफेड करण्यासाठी त्यांनी बँक लुटून पैसे मिळविण्याचा शॉर्ट कट वापरला. तसंच या आरोपी वकिलाचं नुकतंच लग्न झालं होतं. त्यामुळे लग्नानंतर खर्चातही वाढ झाली. हा वाढलेला खर्च कसा करायचा? या चिंतेत आरोपी वकील असल्याचं मोहालीचे  पोलीस अधिक्षक कुलदीप सिंह चहल यांनी सांगितलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार,आरोपी नेहमी मोहालीच्या इंडस्ट्रिअल भागाच्या मार्केटमध्ये यायचा. त्या आरोपी वकिलाने अनेक दिवस त्या भागाची रेकी केली होती. त्यातूनच बँकेच्या आजूबाजूला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसते याची त्याने माहिती मिळवीली होती. बँक लुटल्यानंतर एअरपोर्टच्या रस्त्याने फरार होण्याचं प्लॅनिंगही त्याने केलं होतं. आरोपी वकील मनजिंदर सिंह याने सकाळी बँकेत घुसून दोन गोळ्या झाडल्या आणि साडेसात लाख रूपये घेऊन फरार झाला. बँक लुटल्यानंतर तो वकील घाबरूनच गाडी चालवत होता. त्यावेळी त्याची गाडी एका खांबावर आदळली. त्यामुळे कारची नंबर प्लेट तिथेच पडलं होतं. कारच्या नंबरप्लेटमुळे पोलिसांनी त्याला घटनेनंतर 24 तासाच्या आत शोधून काढलं.