Juhi Chawla News: घूंघट की आड से दिलबर का... 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावलाची गाणी ऐकू येऊ लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 06:57 PM2021-06-02T18:57:46+5:302021-06-02T18:58:23+5:30
Juhi Chawla 5g petition News: न्यायमूर्ती आर मिढा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. या आधी न्यायालयाने आपली बाजू मांडण्यासाठी जुही चावलाला एक संक्षिप्त माहिती देण्यास सांगितले होते.
सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) हिने ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानामुळे माणसालाच नव्हे तर एकूण जीवसृष्टीलाच धोका असल्याच्या शक्यतेविषयी दिल्लीउच्च न्यायालयात याचिका (5g petition) दाखल केली आहे. यावर आज दुपारी 3 वाजता सुनावणी झाली. न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवला आहे. तसेच सरकारशी संपर्क करण्याऐवजी थेट न्यायालयात का हा विषय घेऊन आला, असा प्रश्न चावलाला विचारला आहे. (Please mute, says judge as man sings 'Ghoonghat ki..' seeing Juhi Chawla at 5G hearing)
न्यायमूर्ती आर मिढा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. या आधी न्यायालयाने आपली बाजू मांडण्यासाठी जुही चावलाला एक संक्षिप्त माहिती देण्यास सांगितले होते. दुरसंचार विभागाच्या वतीने वकील अमित महाजन यांना देखील दीड पानांची माहिती देण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. दुपारी 3 वाजता या याचिकेवर सुनावणी झाली.
सुनावणी सुरु असताना एक मजेशीर परंतू अजब घटना घडली. यामुळे न्यायालयाचे कामकाज काही वेळ प्रभावित झाले. जुही चावलाच्या या याचिकेवरील सुनावणी ही व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे होत होती. यावेळी एक व्यक्त मध्येच जुही चावलाच्या सिनेमांतील गाणी गात होता. वारंवार असे होत राहिल्याने न्यायालयाच्या कामात अडथळा येऊ लागला. या व्यक्तीने या सुनावणीवेळी जुही चावलाचे गाणे 'घूंघट की आड़ से दिलबर का...' गायले. यानंतर त्याने तिची आणखी काही गाणी गायली.
कामकाजात खंड पडत असल्याचे पाहून न्यायालयाने त्या व्यक्तीला आवाज म्यूट करण्याचे आदेश दिले. यानंतर कामकाज पुढे सुरु झाले. नंतर न्यायालयाने आदेश दिला की, गाणे गाऊन न्यायालयाची कामकाज बाधित करणाऱ्या या व्यक्तीचा शोध घ्यावा आणि त्याच्याविरोधात अवमानना नोटीस जारी करण्याचे आदेश दिले. (After several disruptions, the court asked to identify the person and issue a contempt notice against him for disturbing the proceeding.)
जुहीची मागणी काय होती...
5G टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता,जीव- जिवाणू, झाडं-झुडपं आणि पर्यावरणावर होणा-या परिणामांशी संबंधित संशोधनाचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी तिने संबंधित याचिकेत केली आहे. आमचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अजिबात विरोध नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन अधिक सुसह्य झाले आहे, हेही मान्य आहे. परंतु 5 Gसारख्या टेक्नॉलॉजीच्या वापराबाबत आपण आजही गोंधळाच्या स्थितीत आहोत. आम्ही स्वत:चा रिसर्च केला तेव्हा आरएफ रेडिएशन आपल्यासाठी अतिशय घातक असल्याचे समोर आले आहे.