घरपीच्या विभागणीसाठी घेतली दीड हजाराची लाच मनपाचे दोन कर्मचार्यांना पकडले : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
By admin | Published: September 28, 2016 10:44 PM
जळगाव: घरपीची विभागणी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्विकारतांना मनपाच्या प्रभाग समिती ३ मेहरुणमधील लिपीक अशोक बंडू म्हस्के व अशोक बळीराम सैंदाणे या दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी पावणे चार वाजता रंगेहाथ पकडले. या दोघांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव: घरपीची विभागणी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्विकारतांना मनपाच्या प्रभाग समिती ३ मेहरुणमधील लिपीक अशोक बंडू म्हस्के व अशोक बळीराम सैंदाणे या दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी पावणे चार वाजता रंगेहाथ पकडले. या दोघांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे समता नगरात असलेल्या घरातील निम्मे घर तक्रारदाराच्या नावे करावयाचे असल्याने मनपाकडून येणारी घरपी व नळपीची वडीलांच्या नावाने विभागणी करावयाची होती. त्यासाठी त्यांनी कागदपत्रांची पुर्तता करुन मेहरुणमधील प्रभाक ३ च्या कार्यालयात लिपीक म्हस्के व सैंदाणे यांची भेट घेतली असता त्यांनी या कामासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत २२ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दोन वेळा शहानिशा केल्यानंतर उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या पथकाने बुधवारी पावणे चार वाजता मेहरुणमधील कार्यालय परिसरात सापळा लावला असता दोघं लिपीक दीड हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ सापडले. या कारवाई नंतर लाचलुचपत विभागाने संध्याकाळपर्यंत दोन्ही कर्मचार्यांच्या घराची झडती घेतली, मात्र त्यात काहीही आढळून आले नसल्याची माहिती पराग सोनवणे यांनी दिली. संध्याकाळी उशिरा एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.