नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि पुढील निर्देशांनुसार अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाला. मात्र असे असले तरी या मुद्द्यावरून काही जणांकडून पुन्हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. काल एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर आता आज अजून एका मुस्लिम नेत्याने या प्रकरणी पुन्हा प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. राम मंदिर तोडून तिथे मशीद बांधली जाईल. त्या ठिकाणी मंदिर कधीच नव्हते, असे विधान ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी यांनी केले आहे.साजिद रशिदी म्हणाले की, इस्लाम सांगतो की, मशीद नेहमी मशिदच राहते. अन्य काही बांधकाम केल्याने मशीदीचे अस्तित्व संपत नाही. बाबरी मशीद तिथे होती आणि नेहमीच मशिदीच्या रूपात तिथे राहील. मंदिर तोडून मशीद बांधण्यात आलेली नाही. मात्र आता असे होऊ शकेल. मंदिर पाडून तिथे पुन्हा मशीद बांधली जाईल.
इतर महत्त्वाच्या बातम्यावुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल