मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये दिवाळीत एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सणासुदीच्या काळात एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फटाके फोडणं एका तरुणीच्या जीवावर बेतलं. स्टिलच्या टिफिनमध्ये लावलेला बॉम्ब एका तरुणीसाठी जीवघेणा ठरला. टिफिनचा तुकडा तिचा पोटात घुसला. त्यामुळे तरुणीला जीव गमवावा लागला आहे.
मंदसौरच्या भावगढतील कारजू गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कारजू गावात राहत असलेल्या गोवर्धनलाल माली यांच्या घरात गोवर्धन पूजा होती. गोवर्धनलाल शेतकरी आहेत. पुजेनंतर त्यांची मुलगी टीना लहान भावासह फटाके फोडत होती. भाऊ स्टिलच्या टिफिनमध्ये सुतळी बॉम्ब ठेऊन फोडू लागला. टीना त्याचा व्हिडीओ शूट करत होती. बॉम्ब फुटताच स्टिलच्या डब्याचा टोकेदार तुकडा तिच्या पोटात घुसला.
टीनाला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून त्यांनी याप्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. टीनाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याामुळे फटाके फोडताना सतर्क राहणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"