तिरुअनंतपूरमः केरळमध्ये गरोदर हत्तिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या हत्तिणीच्या मृत्यूनंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला. भाजपाच्या खासदार असलेल्या मनेका गांधींनीही हत्तिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर एक विधान केलं होतं. त्या विधानावरूनच आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. केरळमधील मल्लपूरम येथे मनेका गांधींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, कलम 153 अन्वये एफआयआर दाखल केला आहे. मल्लपुरम येथे एक हत्तीण भूक लागल्याने अन्नाच्या शोधात वणवण फिरत होती. यावेळी काही लोकांनी तिला फटाके भरलेले अननस खायला घातले. त्या मुक्या जनावराने अन्न समजून ते खाल्लं. कालांतरानं या हत्तिणीला त्रास व्हायला लागला. त्यामुळे ती नदीत जाऊन उभी राहिली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूनंतर मनेका गांधी म्हणाल्या होत्या की, 'हत्तिणीचा मृत्यू नव्हे, तर ही हत्या आहे. मल्लपुरम अशा घटनांसाठी प्रसिद्ध आहे. हे देशातील सर्वात हिंसक राज्य आहे. येथे लोक रस्त्यावर विष फेकतात. ज्यामुळे एकाच वेळी 300 ते 400 पक्षी आणि कुत्री मारली जातात. केरळमध्ये दर तिसर्या दिवशी एका हत्तीला मारले जाते. केरळ सरकारने मल्लपुरम प्रकरणात अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. असे वाटते की ते घाबरले आहेत,' असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानावरून मोठा गदारोळही झाला होता.
हेही वाचा
Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी
पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार
...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख
Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
घरकाम करणाऱ्या महिलेमुळे २० जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; 750 लोक झाले क्वारंटाइन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा