ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 02 - केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांना शुक्रवारी अचानक श्वास घेण्यात त्रास आणि पोट दुखू लागल्याने त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मनेका गांधी पिलीभीतमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी याठिकाणी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्याचा आणि पोट दुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ पिलीभीत येथील रुग्णालयात हलविण्यात आले. येथील रुग्णालयातील इमर्जन्सी वार्डमध्ये ठेवण्यात आले. मात्र, मनेका गांधी यांना पित्ताशयातील खड्याचा त्रास असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिलिभित येथील रुग्णालयातून एअरलिफ्टच्या मदतीने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मनेका गांधी शुक्रवारी दोन दिवसांच्या पिलिभित दौ-यासाठी दाखल झाल्या होत्या. त्या पिलिभित मतदारसंघाच्या खासदार आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रीय महिला वबालकल्याणमंत्री मंत्रीपद आहे.
Delhi: Maneka Gandhi admitted to AIIMS. She was airlifted from Pilibhit after gall bladder ailment.— ANI (@ANI_news) June 2, 2017