Kerala man misbehaves with Crew : उदत्या विमानात प्रवाशाने गोंधळ घातल्याच्या अनेक घटनांबद्दल तुम्ही ऐकले असेल. अशाच प्रकारची घटना एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (Air India Express Flight) दुबई-मंगळुरू फ्लाइटमध्ये घडली. केरळमधील (Kerala) व्यक्तीने उडत्या विमातानून खाली समुद्रात उडी मारण्याची धमकी दिली आणि क्रु मेंबरसोबत गैरवर्तन केले. त्यामुळे या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुहम्मद 8 मे रोजी दुबईहून मंगळुरुला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटमधून प्रवास करत होता. त्याने अचानक क्रु मेंबर्सशी गैरवर्तन केले गोंधळ घातला आणि विमानातून समुद्रात उडी मारण्याची धमकीही दिली. यामुळे फ्लाइटमध्ये उपस्थित इतर लोकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
या प्रकरणाची माहिती देताना एअर इंडिया एक्स्प्रेसचे सुरक्षा समन्वयक सिद्धार्थ दास यांनी प्रवाशाविरुद्ध तक्रार दाखल केली. ज्यानंतर विमान मंगळुरू येथे उतरल्यावर विमानतळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मुहम्मद बीसी असे या प्रवाशाचे नाव असून, तो केरळमधील कन्नूर येथील रहिवासी आहे.