नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यात राहणाऱ्या १०० वर्षीय आजीबाईंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. १०० वर्षीय आजीबाई पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची स्तुती करताना दिसत आहे. खरं तर संबंधित महिला २५ बिघा जमीन मोदींना देणार असल्याचे सांगत आहे. म्हणजेच पंतप्रधान मोदींना सात एकर जमीन देणार असल्याचे आजीबाईंनी म्हटले आहे. मध्य प्रदेशात १ बिघा म्हणजे ०.२७ एकर आहे.
मध्य प्रदेशातील हरिपुरा जागीर गावात ही वृद्ध महिला राहते. मांगीबाईं असे या आजीबाईंचे नाव असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने खूप प्रभावित झाल्या आहेत. "मोदी माझा मुलगा आहे, आम्हाला गहू-तांदूळ, खत-बियाणे दिले आहे. तो आमच्यावर उपचार करत आहे. पीक वाया गेल्यास नुकसान भरपाई देतो. तीर्थयात्रेला देखील नेले. कॉलनीत राहण्यासाठी घर दिले. मला विधवा पेन्शन चालू केली", अशा शब्दांत आजीबाईंनी पंतप्रधानांचे कौतुक केले.
PM मोदींना भेटायचे आहे - मांगीबाईमांगीबाईंनी सांगितले की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कधीच परस्पर भेटली नाही, पण टीव्हीवर अनेकदा पाहिले आहे. मला माझ्या मुलाला म्हणजेच मोदीला भेटायचे आहे. मला त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायचा आहे. मला पंतप्रधान मोदींना एवढेच सांगायचे आहे की, पेन्शन आणखी थोडी वाढवावी."
२५ बिघा जमीन मोदींनाच देणार मांगीबाईंच्या म्हणण्यानुसार, त्यांना एकूण १४ मुले असून १२ मुली आणि दोन मुलगे आहेत. पण सर्वात आवडता मुलगा पंतप्रधान मोदी आहेत. त्यांच्यामुळेच त्यांची इतर १४ मुले काम करत आहेत. त्यांनी घराच्या भिंतीवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावला आहे. तसेच माझी २५ बिघे जमीन मोदींनाच देईन, कारण ते आपल्या सर्वांची काळजी घेत आहेत, असा मानस १०० वर्षीय आजीबाईंचा आहे,
"मी माझ्या मुलांना फक्त पंतप्रधान मोदींनाच मतदान करायला सांगते. पंतप्रधान मोदींनी आम्हा सर्वांना कोरोनापासून वाचवले. लोकांचे भले करताना माझा मुलगा वृद्ध झाला आहे", असेही त्यांनी सांगितले.