भागलपूर : 'मँगो मॅन' म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेले बिहारमधील भागलपूरचे अशोक चौधरी आता आंब्याची एक नवीन व्हरायटी लोकांसमोर आणणार आहेत. या आंब्याचे नाव 'मोदी-3' असणार आहे. अशोक चौधरी यांनी याआधी मोदी-1 आणि मोदी-2 या आंब्याच्या दोन जाती विकसित केल्या आहेत. अशोक चौधरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे चाहते आहेत.
मँगो मॅन या नावाने प्रसिद्ध असलेले अशोक चौधरी यांनी मोदी-1, मोदी-2 आंबे अनुक्रमे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी विजय मिळवल्यामुळे विकसित केले होते. आता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते 'मोदी-3' आंबा घेऊन येत आहेत. अशोक चौधरी हे जर्दालू आणि लंगडा आंब्यांपासून 'मोदी-3' आंबा तयार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशोक चौधरी हे भागलपूरचे जर्दालू आंबे जगप्रसिद्ध करण्यासाठी ओळखले जातात. जर्दालू आंब्याला त्यांच्या प्रयत्नांमुळेच जीआय टॅग मिळाला आहे.
दरम्यान, अशोक चौधरी यांनी आंब्याच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत. 10 एकरांवर पसरलेल्या त्यांच्या आंबा रिसर्च-कम-प्रोडक्शन फार्ममध्ये त्यांनी 100 हून अधिक आंब्यांच्या जाती विकसित केल्याचा त्यांचा दावा आहे. त्यात 30 हून अधिक विदेशी आंब्यांच्या जाती आहेत. विज्ञान आणि कायद्याचे पदवीधर असलेले अशोक चौधरी आंब्याच्या व्यवसायात येण्यापूर्वी सरकारी शाळेत शिक्षक होते. मात्र, त्यांनी काही दिवसांनीच ही नोकरी सोडली आणि आंबा बागायत सुरू केली. आता संपूर्ण देशात त्यांनी 'मँगो मेन' म्हणून ओळख आहे.
मोदींचे मोठे चाहते आहेत अशोक चौधरीअशोक चौधरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे चाहते आहेत. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी विजय मिळवल्यानंतर अशोक चौधरी यांनी हिमसागर आणि मालदा आंब्याच्या जातीला क्रास करुन आंब्याची नवीन व्हरायटी तयार केली. या आंब्याला मोदी-1 नाव दिले. यानंतर 2019 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा निवडणुकून जिंकले. तेव्हा त्यांनी गुलाब खास आणि अमेरिकन आंबा इर्विन यांचे क्रॉस करून एक खास आंबा तयार केला. या आंब्याला मोदी-2 असे नाव दिले. मोदी-2 आंबा हा गोड असून त्याचा रंग वायलेट आहे.