- नितीन अग्रवालनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त उद्गार काढल्याने माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांना काँग्रेसमधून निलंबित करण्याची केलेली कारवाई पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी रद्द केली आहे.मोदींविषयी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. अय्यर यांना काँग्रेसमधून निलंबित करण्याची केलेली कारवाई रद्द करण्याची पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने केलेली शिफारस राहुल गांधी मान्य केली. मणिशंकर अय्यर यांचे काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व गेल्या ७ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आले होते. मोदींबद्दल काढलेल्या वादग्रस्त उद्गारांबद्दल अय्यर यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या आधी मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना आपल्या निवासस्थानी मेजवानीसाठी आमंत्रित केले होते त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपने गुजरात विधानसभा निवडणुक प्रचारामध्ये काँग्रेसविरोधात प्रचार करताना या प्रकरणाचा चलाखीने उपयोग करुन घेतला होता.‘हे' तर काँग्रेसचे नाटक : भाजपमणिशंकर अय्यर यांचे निलंबन हे काँग्रेसने केलेले नाटक होते. हे निलंबन रद्द केल्याने या नाटकाचा पर्दाफाश झाला आहे, अशी टीका भाजपने केली आहे. भाजपचे राष्टÑीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, नऊ महिन्यांपासून काँग्रेसचे हे नाटक चालू होते. गुजरातमधील जनता आणि मागासवर्गीयांचा अवमान करणारे विधान अय्यर यांनी राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरून केले होते का? असा सवालही त्यांनी केला आहे.सिद्धू यांच्यावरूनही निशाणा...अय्यर यांच्या समवेत संबित पात्रा यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावरूनही काँग्रेसवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेऊन आणि पाकव्याप्त काश्मीरच्या अध्यक्षांसोबत स्थानापन्न होऊन त्यांनी भारतीय राजनैतिकतेला नुकसान पोहोचवले. राहुल गांधी यांनी याचे उत्तर द्यावे. सर्जिकल स्ट्राईकबाबत पुरावे मागणाºया काँग्रेसच्या एका मंत्र्याने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतली. यातून काँग्रेसचा दुटप्पीपणा उघड होतो.
मणिशंकर अय्यर यांचे निलंबन काँग्रेसकडून रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 2:07 AM