अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, यात पाटीदार, तरुण आणि छोट्या व्यापा-यांवर लक्ष केंद्रित केले आहे. घटनेच्या कलम ४६ नुसार इितर आरक्षणाला धक्का न लावता अनारक्षित समुदायाला लाभ देण्यात येईल, असे यात म्हटले आहे. बेरोजगार तरुणांसाठी भत्ता आणि छोट्या व्यापाºयांना १.५ कोटींच्या उलाढालीसाठी सूट याबरोबरच पाच वर्षांत २५ लाख घरे उभारण्याचा शब्दही काँग्रेसने दिला आहे.काँग्रेसचे प्रभारी अशोक गहलोत, प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोळंकी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्यात येणार येईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीकडे लक्ष दिले जाईल व त्यांचे सामाजिक अन्याय व शोषणापासून संरक्षण करण्यात येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे. या जाहीरनाम्यानुसार, वीजदरात कपात करतानाच खासगी वीज कंपन्यांना आरटीआय नियमांच्या अंतर्गत आणण्यात येईल. उना प्रकरण आणि थांगध पोलीस गोळीबाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात येईल. आरक्षणांतर्गत रिक्त जागा भरण्यात येतील. खंभातच्या खाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.शेतकºयांचे कर्ज माफशेतकºयांचे कर्ज माफ केले जाईल. सिंचनासाठी मोफत पाणी देण्यात येईल. बेरोजगार युवकांना ३००० ते ४५०० रुपये मासिक भत्ता देण्यात येईल. मुलींना, गरीब व मध्यमवर्गीय मुलांना प्राथमिक ते पीएचडीपर्यंत मोफत शिक्षण, सरदार पटेल हेल्थ कार्डनुसार मोफत औषधे, पौष्टिक आहार, शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकीन, पेट्रोल डिझेलवरील करात कपात, १० रुपयांत जेवण, भूमिहीनांना जमिनीचे वाटप, समान कामासाठी समान वेतन, विधवा व ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन अशा घोषणा जाहीरनाम्यात आहेत.
पाटीदार, तरुण, शेतकरी, व्यापा-यांना झुकते माप , काँग्रेसचा जाहीरनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 3:16 AM