Manipur Assembly elections Result 2022: भाजपाचे 'पुरेपूर मणिपूर'; यूपी, उत्तराखंडसोबत ईशान्येतही पुन्हा 'कमळ' फुलण्याची चिन्हं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:52 AM2022-03-10T10:52:40+5:302022-03-10T10:55:54+5:30
सुरूवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला जोरदार धक्का; अन्य पक्षांची जोरदार मुसंडी.
Manipur Assembly elections Result 2022: मणिपूरसह पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल गुरूवारी सकाळपासून हाती येऊ लागले. यात भाजपा बहुमताच्या आकड्याजवळ आहे. तर भाजपाला टक्कर देण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस खूप कमी जागांवर आघाडीवर आहेत. याउलट अन्य पक्षांचे उमेदवार आघाडीच्या बाबतीत काँग्रेसपेक्षा दुपटीपेक्षाही जास्त असल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजपाचे 'पुरेपूर मणिपूर' हे स्वप्न पुन्हा सत्यात उतरताना दिसत आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडसोबत ईशान्येतही पुन्हा 'कमळ' फुलण्याची चिन्हं दिसत आहेत. (Manipur Assembly elections 2022)
मणिपूरमध्ये एनडीएप्रणित भाजपचे सरकार होते. यंदाही भाजपचेच सरकार मणिपूरमध्ये येत असल्याचं चित्र दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपचे २३ तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे १२ उमेदवार आघाडीवर आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, भाजपाचा थेट सामना असलेल्या काँग्रेसला अन्य स्थानिक पक्षांच्या निम्म्या जागाही मिळत नसल्याचं दिसत आहे. अन्य स्थानिक पक्षांमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचे १२, नागा पीपल्स फ्रंटचे ५ तर एक अपक्षचा ९ आमदार आघाडीवर होते.
२०१७ मध्ये काय घडलं होतं?
२०१७ साली मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. ४ आणि ८ मार्च रोजी मणिपूरमध्ये मतदान झाले होते. तर ११ मार्चला निवडणुकीचे निकाल हाती आले होते. मणिपूरमध्ये एनडीएप्रणित भाजपचे सरकार होते. सरकारमध्ये भाजपचे २९, नागा पीपल्स फ्रंटचे ४, नॅशनल पीपल्स पार्टीचे ३ तर एक अपक्षचा एक आमदार होता. तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे १५ जागा होत्या. तर निवडणुकीच्या वेळी ७ जागा रिक्त होत्या.