शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

बलात्कार अन् नग्न अवस्थेत धिंड! तीन महिन्यांनी खुलासा; मेरठमध्ये मणिपूरच्या घटनेची पुनरावृत्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 5:45 PM

उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे.

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मणिपूर राज्य हिंसाचाराच्या आगीने जळत असतानाच तिथून एक धक्कादायक घटना समोर आली होती. मणिपूरमध्ये नग्न अवस्थेत महिलांची धिंड काढल्याची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशात या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसते. इथे एका आरोपीने आधी तरुणीवर बलात्कार केला नंतर आरोपीच्या साथीदारांनी मुलीला विवस्त्र अवस्थेत उसाच्या शेतातून ओढत बाहेर आणले. संबंधित आरोपींवर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती मिळाली.  खरं तर तीन महिन्यांपूर्वी मेरठमधील किठोरे गावात एका तरुणाने तरुणीला आमिष दाखवून उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर तरुणाचे साथीदार उसाच्या शेतात आले, त्यांनी तरुणीचा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी कधी तरुणीला पोलिसांना बोलावण्याचा धाक दाखवला तर कधी तिच्याशी गैरवर्तन केले. याशिवाय नराधमांनी तिला मारहाण देखील केली. तरुणीने विरोध केला असता आरोपींनी तिला विवस्त्र करून उसाच्या शेतातून रस्त्यावर आणले.

बहिणीच्या मोबाईलवर पाठवला व्हिडीओआरोपींनी व्हिडीओ काढल्यामुळे पीडित तरूणी दबावाखाली होती. मागील रविवारी मुलीसोबत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ आरोपींनी तिच्या बहिणीच्या मोबाईलवर पाठवला. व्हिडीओ पाहिल्यानंतर पीडितेची चौकशी केली असता तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी जाहिद आणि त्याचे दोन साथीदार पप्पू उर्फ ​​जावेद आणि आलम यांना अटक करण्यात आली आहे. तर व्हिडीओ बनवणारे दोन अन्य आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीवर दोन वर्षांपासून लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे. सामूहिक बलात्कार असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत पण यात तथ्य नाही. कारण काही महिन्यांपूर्वी पीडित तरुणी आरोपींसोबत एकांतात असताना काही तरुणांनी त्यांचा अश्लिल व्हिडीओ बनवला आणि ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशManipur Violenceमणिपूर हिंसाचारsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारीArrestअटक