शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

मणिपूरमध्ये आता लष्कराच्या जेसीओचे अपहरण, शोध मोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 7:05 PM

Army JCO Abducted : मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात शुक्रवारी (८ मार्च) भारतीय लष्कराच्या एका कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्याचे (JCO) त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले. 

Army JCO Abducted : मणिपूर : मणिपूरमध्ये एका लष्करी अधिकाऱ्याचे घरातून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूर हिंसाचार सुरू झाल्यापासून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, अधिकाऱ्याचे घरातून अपहरण झाल्याची राज्यातील ही चौथी घटना आहे. मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात शुक्रवारी (८ मार्च) भारतीय लष्कराच्या एका कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्याचे (JCO) त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले. 

पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. समाजकंटकांनी जेसीओचे अपहरण केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोनसम खेडा सिंह असे जेसीओचे नाव असून ते चारंगपत मामंग लिकई येथील रहिवासी आहेत. ते रजेवर असताना सकाळी ९ वाजता काही अज्ञात लोक त्यांच्या घरात घुसले आणि त्यांचे अपहरण केले. कोनसम खेडा सिंह यांना अज्ञात लोक कारमधून घेऊन गेले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपहरणाचे कारण अद्याप समजले नसले तरी, प्राथमिक तपासात हे खंडणीचे प्रकरण असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण त्यांच्या कुटुंबाला यापूर्वीही अशा धमक्या आल्या होत्या. दरम्यान, अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर जेसीओच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तरित्या शोध मोहीम सुरू केली. राष्ट्रीय महामार्ग 102 वरून जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी सुरू आहे.

मणिपूरमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतरची चौथी घटनामणिपूरमधील संघर्षाच्या सुरुवातीपासूनची ही चौथी घटना आहे, ज्यात रजेवर असलेल्या किंवा कर्तव्यावर असलेल्या सैनिकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना लक्ष्य करण्यात आले आहे. सप्टेंबर 2023 मध्ये आसाम रेजिमेंटचे माजी सैनिक सेर्टो थांगथांग कोम यांचे खोऱ्यातून अज्ञात सशस्त्र समुहाने अपहरण करून त्यांची हत्या केली होती. ते मणिपूरमधील लिमाखॉन्ग येथील डिफेन्स सर्व्हिस कॉर्प्स (DSC) मध्ये तैनात होते.

या घटनेच्या दोन महिन्यांनंतर अज्ञात सशस्त्र समुहाने चार लोकांचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. एका कारमधून चुराचंदपूरच्या पहाडी जिल्ह्यातून लिमाखोंगला जात असताना त्यांची हत्या करण्यात आली होती. हे चौघेही जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय लष्करातील जवानाच्या कुटुंबातील सदस्य होते. तसेच, या कारमधील पाचवा प्रवासी (सैनिकाचे वडील) पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्याला लष्कराने उपचारासाठी दिमापूरला नेले. नंतर त्याला आसाममधील गुवाहाटी येथील बेस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.

याचबरोबर, मणिपूर पोलिसांच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांवर (एएसपी) 27 फेब्रुवारी रोजी इंफाळ शहरातील त्यांच्या घरी हल्ला झाला होता. या प्रकरणातील हल्लेखोरांची ओळख अरमबाई तेंगगोल (एटी) अशी झाली. हा एक कट्टरपंथी मैतेई समूहातील आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारIndian Armyभारतीय जवान