इंफाल - गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. मणिपूर हिंसाचाराने होरपळून निघत आहे. यातच आता NDA चा सहकारी पक्ष असलेल्या कुकी पीपल्स अलायन्सने (KPA) रविवारी मणिपूरमध्ये एन बिरेन सिंह (N Biren Singh) यांच्या नेतृत्वा खालील सरकारचा पाठिंबा काढला आहे. मात्र KPA ने एनडीएचा पाठिंबा काढला असला तरी याचा सरकारवर कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. कारण भाजप युतीला येथील 60 सदस्यिय विधानसभेत बहुमत मिळालेले आहे.
कुकी पीपल्स अलायन्सच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, के.एच. हांगशिंग (सेक्युल) आणि चिनलुंगथांग (सिंघट) यांनी मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. दोन्ही आमदारांनी मणिपूरच्या राज्यपालांना लिहिलेल्या पत्राक म्हटले आहे, ‘सध्याच्या संघर्षमय परिस्थितीचा बारकाईने विचार करता, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मणिपूर सरकारला पाठिंबा कायम ठेवणे आता शक्य नाही. त्यामुळे केपीए मणिपूर सकारचा पाठिंबा काढत आहे.
महत्वाचे म्हणजे, कुकी पीपल्स अलायन्सकडे केवळ दोन आमदार आहेत. या दोन्ही आमदारांनी सरकारचा पाठिंबा काडला असला तरी त्याचा सरकारवर कसल्याही प्रकारचा परिणाम होणारन नाही. 60 सदस्यांच्या या मणिपूर विधानसभेत 32 जागांसह भाजपकडे सर्वाधिक आमदार आहेत. याशिवाय, पक्षाला एनपीएफचे पाच आमदार आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच, दुसरीकडे, विरोधी पक्षात एनपीपीच्या सात, काँग्रेसच्या पाच आणि जेडीयूच्या सहा सदस्यांचा समावेश आहे.
मणिपूर हिंसाचारमणिपूरमध्ये मतैई समाजाने अनुसूचित जमातीच्या (एसटी) दर्जा संदर्भात मागणी केली आहे. याच्या निषेधार्थ पाहाडी जिल्ह्यांमध्ये 3 मे रोजी 'आदिवासी एकता मोर्चा' आयोजित करण्यात आला होता. यानंतर येथे हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत.