शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

मणिपूर: मला घ्यायला परत ये... आजीचे शेवटचे शब्द; हल्लेखोरांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला जिवंत जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:29 PM

Manipur violence Horror story : पीडित आजींचे दिवंगत पती एस चुराचंद सिंह यांना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सन्मानित केले होते.

इंफाल - मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काढल्याच्या प्रकरणानंतर, हृदय पिळवटून टाकणाऱ्या अनेक कथा, घटना समोर येत आहेत. काकचिंग जिल्ह्यातील सेराऊ गावात एक स्वातंत्र्य सेनानीच्या 80 वर्षांच्या पत्नीस त्यांच्याच घरात जिंवंत जाळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर, त्यांचा नातू जेव्हा तेथे पोहोचला, तेव्हा केवळ मलब्यात दबलेले अवशेषच त्याच्या हाती लागले. पीडित आजींचे दिवंगत पती एस चुराचंद सिंह यांना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सन्मानित केले होते.

घर बाहेरून बंद करून लावण्यात आली आग -या वृद्ध अजीचे नाव इबेतोंबी असे होते. सेराऊ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, 80 वर्षांच्या या आजींना त्यांच्या घरात बंद करण्यात आले आणि शस्त्रधारी जमावाने घराला घेऊन आग लावली. ही घटना 28 मेच्या रात्रीची आहे. याच दिवशी सेराऊमध्ये प्रचंड हिंसाचार आणि गोळीबारही झाला होता.

'आजीने आधी आम्हाला पळून जाण्यास सांगितले होते' -इबेतोंबी यांचे नातू प्रेमकांत यांनी एनडीटीव्हीसोबत बोलताना सांगितले, "मी मृत्यूला थोडक्याने मात दिली. आजीला वाचविण्याच्या प्रयत्नात माझ्या हाताला आणि मांडीला गोळी लागली होती आणि मी जखमी झालो होतो. जेव्हा आमच्यावर हल्ला झाला, तेव्हा माझ्या आजीने वयाच्या कारणामुळे आधी आम्हाला पळून जाण्यास सांगितले होते. घराबाहेर गोळीबार सुरू होता. अशा परिस्थितीत वृद्ध व्यक्तीला तेथून पळ काढणे अवघड होते. आम्ही जेव्हा निघालो तेव्हा, आजी म्हणाली होती, माझ्यासाठी परत या, ते तिचे शेवटचे शब्द होते."

'आम्ही  जेव्हा परतलो तेव्हा...' -प्रेमकांत यांची पत्नी तंपकसना यांनी सांगितले, आम्ही पळ काढून स्थानिक आमदाराच्या घराचा आसरा घेतला होता. आम्ही रात्री दोन वाजता घरातून पळून कसे बसे आमदाराच्या घरी पोहोचलो होतो. यानंतर आम्ही पहाटे साडेपाच वाजता तेथे गेलो, तेव्हा आमचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCrime Newsगुन्हेगारी