इंफाळ : मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार उसळला होता. त्यानंतर मणिपूरमध्ये काही महिने शांतता होती. आता परिस्थिती आता सामान्य होताना दिसत आहे. येथील लोकांची दिनचर्या हळूहळू रुळावर येत आहे. अशा परिस्थितीत मणिपूरमधील सरकारी निर्बंधही शिथिल केले जात आहेत. अशा परिस्थितीत येथील बंडखोर गटांकडून काही कारवाया केल्या जात आहेत, त्यामुळे आसाम रायफल्सची चिंता वाढली आहे.
दरम्यान, आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहिले आहे. या पत्रात आसाम रायफल्सने म्हटले आहे की, अशा ट्रकचा वापर बंडखोर गट करत आहेत, ज्यावर निमलष्करी दलाचे चिन्ह आहे. आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहून काकचिंग जिल्ह्यात असे अनेक ट्रक वापरले जात असल्याचे म्हटले आहे. या ट्रकमध्ये निमलष्करी दलाच्या ट्रकप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.
या ट्रकमध्ये बदल करून आसाम रायफल्सची प्रतिमा डागाळण्याचा उद्देश असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच, त्याचा वापर देशविरोधी कारवायांमध्ये होऊ शकतो. आसाम रायफल्सने चुराचंदपूर पोलिसांना ककचिंग जिल्ह्यातील एसपी आणि उच्च अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, मणिपूर राज्य सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेत अनेक महिन्यांपासून ठप्प असलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे.
मणिपूरमध्ये ३ मे रोजी जातीय हिंसाचार उसळला होता. मणिपूरमध्ये बहुसंख्य मैतेई आणि अल्पसंख्याक कुकी जमातींमध्ये हा जातीय हिंसाचार झाला होता. जवळपास चार महिने दोन्ही समाजामध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तसेच, घरांची मोठ्याप्रमाणात जाळपोळ झाली होती. या हिंसाचारानंतर सुमारे १७५ लोकांचा मृत्यू झाला. तसेच, या हिंसाचारात शेकडो लोक जखमी झाले आहेत.