मणिपूरमधील दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढण्यात आल्याच्या घटनेवरून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी छत्तीसगड आणि राजसथानसह इतर राज्यांचा उल्लेक करून देशाला तोडले, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
ममता म्हणाल्या, ''पंतप्रधान मोदींनी केवळ मणिपूरवच भाष्य केले नाही, तर त्यांनी मणिपूरसोबत पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थानलाही जोडले. पण देशाला तोडले. असे होत नाही. वाईट गोष्ट वाईटच असते. आमच्यावर हल्ला करण्यासाठी एखादी गोष्ट दाबने योग्य नाही. आज हे लोक हिंसाचार आणि महिलाच्या लुटीचे 'सौदागर' बनले आहेत.''
बनर्जी म्हणाल्या, आज आपल्या देशातील माता आणि बगिनी आज विलाप करत आहेत. एवढेच नाही, तर पीटीआयनुसार, ममता यांनी म्हटले आहे की, त्या मणिपूर दौरा करण्यासंदर्भात इतर राज्यांच्या मुख्यंमंत्र्यांसोबतही चर्चा करत आहेत.
काय म्हणाले होते PM मोदी?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे मानसून सत्र सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले होते "घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो अथवा मणिपूरची असो, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यातील कुठल्याही राज्य सरकारने राजकीय वाद-विवाद बाजूला ठेऊन कायदा आणि सुव्यवस्थेला महत्व द्यायला हवे आणि स्त्रीच्या सन्मानाचे रक्षण करायला हवे.''
मोदी पुढे म्हणाले, मी देशातील जनतेला विश्वास देतो की, कुठल्याही गुन्नहेगाराला सोडले जाणार नाही. कायदा आपल्या संपूर्ण शक्तीनिशी पावले उचलेल. मणिपूरच्या मुलींसोबत जे घडले, त्यांच्या गुन्हेगारांना कधीही क्षमा केली जाणार नाही.