उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा टाळण्यासाठी - मनीष शेळकेची बातमी
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा टाळण्यासाठी
उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा टाळण्यासाठी घाटी ब्लड बँकेच्या वतीने जनजागृतीऔरंगाबाद : उन्हाळ्यात महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे रक्तदान शिबिरे पूर्णत: थांबतात. त्यामुळे दरवर्षी घाटी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. हा तुटवडा निर्माण न होता गरीब रुग्णांचे प्राण वाचावे, याकरिता घाटीतील ब्लड बँकेच्या वतीने आपल्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांकडून शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह औद्योगिक परिसरात जाऊन जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.तरुण वर्गातून मोठ्या प्रमाणात रक्तदान केले जाते; परंतु फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षांना प्रारंभ होतो. त्यामुळे दरवर्षीही उन्हाळ्यात रक्ताचा घाटीत मोठा तुटवडा निर्माण होतो. घाटीत येणारे रुग्ण हे अत्यंत गरीब असतात. त्यांना बाहेरून विकत रक्त घेणे परवडत नाही. म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बिंदू व सहयोगी प्रा. हेमंत कोकणाडाकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध बँका, एलआयसी, बीएसएनएल यासह अन्य कार्यालयांत जाऊन रक्तदानास प्रवृत्त करण्याचे काम करण्यात येत आहे. घाटीतील ब्लड बँकेतून दररोज ७० ते १०० बॅगा रुग्णांना देण्यात येतात. रक्तदान शिबिरांशिवाय स्वेच्छेने ब्लड बँकेत येऊन रक्तदान करणार्यांची संख्या वाढावी, हा या जनजागृतीमागील उद्देश असून, स्वेच्छेने रक्तदान करणार्यांची संख्या ९० टक्क्यांपर्यत वाढली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रसूत होणार्या महिला, अपघात, कर्करोग व मोठ्या शस्त्रक्रि यांकरिता सर्वाधिक रकचत लागते. अलीकडे रक्ताचा तुटवडा सतत जाणवत असल्याचे डॉक्टर म्हणाले. १ ते १५ ऑक्टोबर हा स्वेच्छा रक्तदान पंधरवडा म्हणून पाळण्यात येतो. यादरम्यानही प्रदर्शनासह जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले जातात.(जोड आहे)