नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत इतर सहा सहकारीसुद्धा शपथबद्ध झाले होते. दरम्यान, केजीवाल सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून, केजरीवाल यांनी आपले विश्वासू सहकारी असलेल्या मनीष सिसोदिया यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह अन्य महत्त्वपूर्ण अशी खाती सोपवली आहेत. आम आदमी पक्षाच्या दुसऱ्या कार्यकाळात मनीष सिसोदिया यांनी आपल्या कार्याची छाप पाडली होती. दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे शिक्षण, वित्त, नियोजन, बांधकाम, पर्यंटन, सेवा, कला, सांस्कृतिक आणि भाषा ही खाती सोपवण्यात आली आहेत.
दिल्लीचे मनीष सिसोदिया यांनी पटपडगंज विधानसभा मतदार संघातून विजय मिळविला होता. या विधानसभा निवडणुकीत मनीष सिसोदिया यांनी भाजपाचे उमेदवार रविंदर सिंह नेगी यांचा पराभव केला. मात्र विजय मिळवण्यासाठी सिसोदिया यांना शेवटपर्यंत झुंज द्यावी लागली होती. मतमोजणीच्या सुरुवातीच्या अनेत फेऱ्यांमध्ये सिसोदिया हे पिछाडीवर होते. मात्र अखेरच्या फेऱ्यांमध्ये पिछाडी भरून काढत त्यांनी विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या
बिहारमध्ये केजरीवालांच्या साथीत प्रशांत किशोर यांचा राजकीय प्रयोग ?
केजरीवालांचे कौतुक करण्यावरून काँग्रेस नेते ट्विटरवर भिडले; 'आप'मध्ये जाण्याचा दिला सल्ला
केजरीवालांच्या शपथविधीत उपस्थित असलेल्या भाजपाच्या एकमेव आमदाराला मिळाले नाही आसन