केंद्रीय मंत्री किंवा नेत्याने लस का टोचून घेतली नाही, मनीष तिवारी यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 05:02 AM2021-01-17T05:02:05+5:302021-01-17T05:03:09+5:30
हैदराबादस्थित भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष येणे बाकी असताना त्याआधीच तिच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. वैद्यक क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी केंद्राच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे, असे जर केंद्र सरकार वारंवार सांगत आहे तर सरकारपैकी कोणाही मंत्री वा नेत्याने ही लस स्वत:ला का टोचून घेतली नाही, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी केंद्राच्या दृष्टिकोनावर टीका केली आहे.
हैदराबादस्थित भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष येणे बाकी असताना त्याआधीच तिच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. वैद्यक क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी केंद्राच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
लोकांना ही लस देण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांपैकी कोणी का नाही ही लस टोचून घेतली, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादाच्या मागे लपत नेत्यांनी लोकांनाच ही लस घेण्यास भाग पाडल्याची टीकाही त्यांनी केली. नॉर्वेमध्ये फायझरच्या लसीमुळे २३ जणांचा मृत्यू झाला, याकडेही तिवारी यांनी लक्ष वेधले.