मनीषा महाजन यांना हवी बदली जिल्हा आरोग्याधिकार्यांशी चर्चा : सलग दोन दिवस जि.प.मध्ये हजेरी
By admin | Published: July 30, 2016 10:37 PM
जळगाव : राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे माजी सचिव सुनील माळी यांच्यावर छळ केल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणार्या जिल्हा परिषदेच्या पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांनी पातोंडा आरोग्य केंद्रात पुन्हा काम करणे अवघड जात असल्याचे सांगून आपली जि.प.च्या इतर आरोग्य केंद्रात नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
जळगाव : राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे माजी सचिव सुनील माळी यांच्यावर छळ केल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणार्या जिल्हा परिषदेच्या पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांनी पातोंडा आरोग्य केंद्रात पुन्हा काम करणे अवघड जात असल्याचे सांगून आपली जि.प.च्या इतर आरोग्य केंद्रात नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेकडे केली आहे. डॉ.महाजन यांनी त्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.बी.आर.पाटील यांना सविस्तर निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मला पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा काम करताना मानसिक त्रास होतो. या केंद्रात आपल्याला काम करायचे नाही. असे त्यांनी सांगितले आहे. याच केंद्रात मोठे काम आणि आत्महत्येचा प्रयत्नपातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिजीटल सेवा सुरू करण्यासाठी डॉ.महाजन यांनी पुढाकार घेतला. त्यात त्या यशस्वी झाल्या. हे जिल्ातील पहिले डिजीटल प्राथमिक आरोग्य केंद्र बनले. त्याबाबत सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी डॉ.महाजन यांचे विशेष कौतुक करून जिल्हाभरात काही प्राथमिक आरोग्य केंद्र डिजीटल बनविण्याचा विचार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. आणि याच आरोग्य केंद्रातील आपल्या शासकीय निवासस्थानात डॉ.मनीषा महाजन यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्नदेखील केला. त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. दोन दिवस जि.प.मध्ये हजेरीजिल्हा परिषद व इतर आरोग्य यंत्रणेतील अधिकार्यांचे शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस नियमित प्रशिक्षण, मार्गदर्शन जिल्हा रुग्णालयामध्ये झाले. त्यानिमित्ताने डॉ.महाजन सलग दोन दिवस शहरात आल्या. त्यांनी नंतकर जिल्हा परिषदेत येऊन आपल्या वरिष्ठ अधिकार्यांचीदेखील भेट घेतली. पोलीस सुरक्षाहीडॉ.महाजन यांना पोलीस सुरक्षा आहे. त्यात एक महिला व पुरुष पोलीस कर्मचार्याचा समावेश आहे. हे दोन्ही कर्मचारी जि.प.मध्ये डॉ.महाजन यांच्यासोबत दिसून आले. बदलीबाबत सीईओंशी चर्चा, नवीन ठिकाणी नियुक्ती करणारडॉ.मनीषा महाजन यांनी दिलेल्या निवेदनाबाबत जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.बी.आर.पाटील यांनी लागलीच सीईओ आस्तिककुमार पांडेय यांच्याशी चर्चा केली. त्यात सीईओ यांनी नियम, निकष लक्षात घेऊन शक्य होत असेल तर डॉ.महाजन यांना इतर आरोग्यकेंद्रात नियुक्ती द्या, अशी सकारात्मक भूमिका घेतली आहे. यानुसार डॉ.महाजन यांची नवीन आरोग्य केंद्रात नियुक्ती होईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.पाटील यांनी सांगितले.