जहानाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक आचारसंहिता जारी झाली असतानाच रविवारी माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा मुलगा प्रवीण कुमार यास ४.६५ लाख रुपयांची रोख बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले.गया-जहानाबाद मुख्य मार्गावरील उमटा गावानजीकच्या टोलनाक्यावर वाहनांची नियमित तपासणी सुरूअसताना प्रवीण कुमार यांच्या वाहनात ही रोख रक्कम आढळून आली. ही रोख घेऊन तो पाटण्यास निघाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनातील इतक्या रोख रकमेबाबत प्रवीणकुमार समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. यानंतर चौकशीसाठी त्याला मखदूमपूर ठाण्यात नेण्यात आले. माजी मुख्यमंत्री व हिंदुस्तानी अवाम मोर्चा सेक्युलरचे संस्थापक असलेले मांझी सध्या रालोआतील जागा वाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीत आहेत. (वृत्तसंस्था)
साडेचार लाखांसह मांझी पुत्र ताब्यात
By admin | Published: September 14, 2015 1:23 AM