डॉ. मनमोहनसिंग अतिशय प्रामाणिक, ओबामांच्या पुस्तकातील 'मन की बात'
By महेश गलांडे | Published: November 13, 2020 01:57 PM2020-11-13T13:57:00+5:302020-11-13T14:00:40+5:30
बराक ओबामा यांनी आपल्या या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अपार निष्ठा बाळगणारी व्यक्ती असा उल्लेख ओबामा यांनी केला आहे.
नवी दिल्ली - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे 'अ प्रॉमिस्ड लँड' हे पुस्तक सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. दरम्यान, या पुस्तकामध्ये भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्याबाबतही उल्लेख असल्याने आता भारतातही या पुस्तकाची चर्चा सुरू झाली आहे. मनमोहन सिंग आणि बराक ओबामा यांची चांगली मैत्री आहे. विशेष म्हणजे मनमोहनसिंग यांचा आजही बराक ओबामा तेवढाच आदर करतात, जेवढा पंतप्रधान असताना ते करत. त्यामुळेच, मनमोहन सिंग यांचं व्यक्तीमत्वा एका वाक्यात उलघडण्याचा प्रयत्न ओबामा यांनी केलाय.
बराक ओबामा यांनी आपल्या या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अपार निष्ठा बाळगणारी व्यक्ती असा उल्लेख ओबामा यांनी केला आहे. या पुस्तकामध्ये अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे एका कडक शिस्तीच्या बॉसची आठवण करुन देतात, तर भारताचे पंतप्रधान राहिलेले मनमोहनसिंग अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहेत, त्यामुळेच त्यांची वेगळी प्रतिमा बनते, असे ओबामा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधींबद्दलही बराक ओबामा यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आपल्याला चार्ली क्रिस्ट आणि रहम एमैनुएल यांसारख्या हॅण्डसम पुरुषांबद्दलच सांगण्यात आलं आहे. पण, महिलांच्या सुंदरतेबद्दल सांगितलं नाही. केवळ एक किंवा दोन उदारणच अपवाद आहेत, जसं की सोनिया गांधी. तसेच, अमेरिकेचे माजी संररक्षण मंत्री आणि मनमोहन सिंग हे दोन्ही नेत्यांमध्ये भावशून्य प्रामाणिकता असल्याचं ओबामा यांनी लिहिलं आहे.
Rahul Gandhi like student 'eager to impress' but lacks aptitude, says Barack Obama in memoir
— ANI Digital (@ani_digital) November 13, 2020
Read @ANI Story | https://t.co/nmuaNlV8uypic.twitter.com/2UCa2P2Lbs
बराक ओबामा यांनी आपल्या नव्या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाड येथील खासदार राहुल गांधी यांच्याबाबत उल्लेख करतान म्हटले आहे की, राहुल गांधी हे एक नर्व्हस आणि अपरिपक्व व्यक्ती आहेत. एखादा विद्यार्थी जसा आपल्या अभ्यास करून शिक्षकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच्यामध्ये त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची पात्रता नसते किंवा त्या विषयाबाबत आवडीचा अभाव असतो, तसं त्यांच्याबाबत घडत आहे.
बराक ओबामा हे २०१७ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांची आणि राहुल गांधी यांची भेट झाली होती. बराक ओबामा यांच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत उपयुक्त चर्चा झाली. त्यांना पुन्हा एकदा भेटणे हा चांगला अनुभव होता. बराक ओबामा यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये ड्रिम्स फ्रॉम माय फादर, द ऑडेसिटी ऑफ होप आणि चेंज वी कॅन बिलिव्ह इन यांचा समावेश आहे.