शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 5:45 AM

आकाशवाणीवरील या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या ११४ व्या भागाला संबोधित करताना मोदींनी या भागाचा तसेच आपल्या कार्यकालाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : “श्रोते हेच ‘मन की बात’ कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. या रेडिओ कार्यक्रमाने हे सिद्ध केले आहे की, देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी किती भुकेले आहेत. सकारात्मक गोष्टी आणि प्रेरणादायी उदाहरणे त्यांना खूप आवडतात,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले.

आकाशवाणीवरील या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या ११४ व्या भागाला संबोधित करताना मोदींनी या भागाचा तसेच आपल्या कार्यकालाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. या कार्यक्रमाच्या दीर्घ प्रवासात असे अनेक टप्पे आहेत, जे ते कधीही विसरू शकत नाहीत. आमच्या प्रवासात असे अनेक सोबती आहेत, ज्यांच्याकडून आम्हाला सतत सहकार्य मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी माहिती दिली.

मन की बात’ने ते खाेटे ठरवले‘मन की बात’चे श्रोते हेच खरे सूत्रधार आहेत. कार्यक्रमात मसालेदार आणि नकारात्मक विषय असल्याशिवाय त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असा एक समज सर्वसाधारणपणे निर्माण झाला आहे; पण ‘मन की बात’ने तो खोटा ठरवला, असे ते म्हणाले.

एक पेड माँ के नामn“माझ्यासाठी ‘मन की बात’ची ही संपूर्ण प्रक्रिया मंदिरात जाऊन देवदर्शनासारखी आहे,” असे सांगत मोदी यांनी आभार मानले.nपंतप्रधान मोदींनी जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, ‘एक पेड माँ के नाम’ आणि स्वच्छता अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. बायडेन यांनी ३०० वस्तू परत केल्याअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जवळपास ३०० प्राचीन वस्तू भारताला परत केल्या. जेव्हा लोक त्यांच्या वारशाचा अभिमान बाळगू लागतात, तेव्हा जग त्यांच्या भावनांचा आदर करते. दहा वर्षांत विविध देशांनी भारतातील अनेक प्राचीन वस्तू परत केल्या आहेत.

भारत बनला जगात निर्मितीचे ‘पॉवरहाउस’nभारत आज जगातील एक उत्पादन शक्ती केंद्र बनला आहे आणि सरकार जागतिक दर्जाच्या वस्तूंच्या निर्मितीसाठी काम करत असल्याने सर्व देशांच्या नजरा आमच्याकडे आहेत.nस्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यावरही भर देत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. n‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला दहा वर्षे पूर्ण होत असून, प्रत्येक क्षेत्रात निर्यात वाढत आहे आणि थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) झालेली वाढ हा त्याच्या यशाचा पुरावा आहे, यामुळे स्थानिक उत्पादकांना मोठी मदत झाली.nआगामी सणासुदीच्या काळात स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

टॅग्स :Man ki Baatमन की बात