पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज ७८ व्या मन की बात (Mann ki Baat) कार्यक्रमात देशवासियांना संबोधित केले. सुरुवातीला मोदींनी काही प्रश्न विचारले आहेत, या प्रश्नांचे उत्तर देऊन तुम्ही बक्षीस मिळवू शकता. टोकिओ ऑलिंपिक ते लसीकरण यावर मोदी आज बोलले. यावेळी त्यांनी मिल्खा सिंग यांच्याकडून मी एक वचन घेतले होते, असेही ते म्हणाले. (Prime Minister Narendra Modi encouraged the citizens to take the Covid-19 vaccine immediately, while refuting rumours and hearsays about the jabs.)
मध्य प्रदेशमधील एका ग्रामस्थाने मोदींना कोरोना लसीच्या भीतीबद्दल कळविले होते. मोदींनी या मन की बातमध्ये राजेश हिरावे या नागरिकाला फोन करून त्याच्याशी चर्चा केली. हिरावे ने सांगितले की, व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे मेसेज येत आहेत, त्यामुळे लसीची भीती वाटत आहे. यामुळे लसीकरणाला गेलो नाही. यावर मोदींनी त्याला आपण आणि १०० वर्षीय आईने कोरोना लस घेतल्याचे सांगितले. तसेच लसीपासून घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले.
गेले वर्षभर, रात्रंदिवस एक करून संशोधकांनी यावर काम केले आहे. यामुळे आपल्याला विज्ञानावर विश्वास ठेवायला हवा. तसेच हे खोटे पसरविणाऱ्या लोकांना वारंवार असे नसते, कोरोना लस घेतल्यामुळे काही होत नाही, असे समजवायला पाहिजे, असे सांगितले.
ऑलिम्पिकबाबत बोलताना मोदींनी साताऱ्याचे तिरंदाज प्रवीण जाधवचेही नाव घेतले. तसेच छोट्या छोट्या शहरांतून आलेल्या खेळाडूंचेही नाव घेतले. फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांचीही आठवण मोदी यांनी सांगितली. कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांना यावेळी भारतीय खेळाडू टोकिओ ऑलिंपिकला जात आहेत, त्यांचे मनोबल वाढविण्याची विनंती मी केली होती. तेव्हा त्यांनी बेडवर असतानाही लगेचच होकार दिला होता, असे सांगितले. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते, असे ते म्हणाले.
गेल्या वेळी काय म्हणालेले मोदी...३० मे रोजी झालेल्या मोदींच्या मन की बात कार्यक्रमात त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्याचा मार्ग सांगितला होता. त्याच दिवशी मोदींना सत्तेत येऊन ७ वर्षे झाली होती. यावेळी मोदींनी सरकारने काय काय केले याची माहिती दिली होती.